ज्ञानेश्वर वस्ती -बढेकर मळा ते देहू पायी दिंडी सोहळा
लोणी-धामणी : प्रतिनिधी -कैलास गायकवाड
दिः१८/०३/२०२२. ह.भ.प.गोविंद महाराज केंद्रे यांच्या प्ररनेने संत ज्ञानेश्वरी वस्ती धामणी-बढेकरमळा (ता. आंबेगाव) ते देहू पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार ( दि:१८ ) रोजी सकाळी नऊ वाजता झाले. ह.भ.प.संतोष महाराज बढेकर व ह.भ.प. अविनाश महाराज बढेकर यांच्या मार्गदर्शना खाली या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन नियोजन केले असून,बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते विनापूजन करून पायी दिंडी सोहळा मार्गस्थ झाला.
या पायी दिंडी सोहळ्याचे हे अठरावे वर्षे असून दरवर्षी होळी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी म्हणजे धुलिवंधनाच्या दिवशी दिंडी मार्गस्थ होत असते.धामणी,बढेकरमळा, पहाडधरा,जारकरवाडी,अवसरी बुद्रूक,वाफगाव, टाकळकरवाडी,गुळाणी येथील ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी असतात.दिंडी सोहळा प्रस्थानाच्या वेळी माजी उपसरपंच प्रदिप बढेकर, रामदास बढेकर,सुरेश बढेकर,संजय बढेकर, कोंडीभाऊ बढेकर,मधुकर बढेकर,राजू मांदळे व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
: ज्ञानेश्वर वस्ती-बढेकरमळा ते देहू पायी दिंडा सोहळा प्रस्थान.