निगंनुर येथे मानव विकास मिशनचे शिबिर सपंन्न
मानव विकास मिशन आरोग्य शिबिराचा गर्भवती माता व स्तनदा माता तसेच 0 ते 6 महिन्याच्या बालकांना फायदा घ्यावा व आपले आरोग्य उत्तम ठेवावे .
डॉ सुनील दुबे.वैद्यकीय अधिकारी प्रा.आ .केंद्र कोर्टा.
प्रतिनिधी निगंनूर . मैनोदिन सौदागर ता.उमरखेड. जि.यवतमाळ.
कोरटा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या निंगणुर येथील आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर माता स्तनदा माता व ०ते ६ महिने आतील बालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व औषध वितरण करून मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील दुबे. यवतमाळ येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ मधुकर मडावी .बाल रोग तज्ञ डॉ रविशेखर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली .
प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ ताराचंद्र ढोके .डॉ बाळू देशमुख. यांनी आलेल्या रुग्णाची रक्त. तपासणी OGGT Test व Sickle cell तपासणी करून योग्य माहिती दिली. निंगणुर हे गाव व परिसरातील आरोग्याच्या बाबतीत कायमच दुर्लक्षित राहात होते एखादे वेळी नागरिकांना वातावरणातील बदलाने होणाऱ्या सामान्य आजाराला ही फुलसांवगी किंवा ढाणकी येथे जाऊन उपचार करावा लागतो याची कल्पना नागरिकांना आल्याने रुग्णानी निंगणुर प्राथमिक उपकेंद्रात होणाऱ्या मानव विकास शिबिराचा फायदा घेण्याचे ठरवले आहे त्यामुळे १६ मार्च रोजी झालेल्या मानव विकास शिबिराला ७२ गरोदर माता स्तनदा माता ६३ व ६३ लहान बालके यांनी तपासणी व औषधोपचार करण्यात आला.
या मानव विकास आरोग्य शिबिरात गरोदर महिलांना व लहान बालक आहार विहाराबाबत सुद्धा घेण्यात येणारी काळजी याची माहिती देण्यात आली व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्य विभाग सतत विविध शासकीय उपक्रमाद्वारे कार्य करत आहेयाची माहिती देण्यात आली . या आरोग्य शिबिरादरम्यान आरोग्य सहाय्यक श्री उमेश सरोदे श्री रवी बोरचाटे . आरोग्य सेवक एन एन वाघमारे आरोग्य सेविका डि सि नैताम. व समुदाय अधिकारी डॉ संतोष सकर्ग तसेच वाहन चालक परमेश्वर हगवणे महिंद्र शेळके व इतर आरोग्य कर्मचारी यांनी उपस्थित राहून गावातील अन्य रुग्णाचे भेट घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. अशाप्रकारे यापुढेही आरोग्य शिबीर घेण्याची मागणी निंगणुर येथील नागरिक मागणी करीत आहे.