Type Here to Get Search Results !

कोरपना | हेटी येथे विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या

                       हेटी येथे विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या



चंद्रपूर /कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना – तालुक्यातील हेटी येथील एका शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.१७ मार्चला सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.


अरविंद गणपत देरकर (४५) रा. हेटी असे मृतकाचे नाव आहे. त्यांनी हेटी येथील एका शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी घटनास्थळी पंचनामा करून


 

मृतकाच्या पार्थिवाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणण्यात आले.

घटनेचा पुढील तपास कोरपना चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad