Type Here to Get Search Results !

फुलसांवगी येथील आग ग्रस्तांच्या मदतीसाठी गावकरी सरसावले

फुलसांवगी येथील आग ग्रस्तांच्या मदतीसाठी गावकरी सरसावले 




पीडितांना शिलाई मशीन व रोख रक्कम वितरण
दीड लाखाची गावकऱ्यांनी केली लोक वर्गणी

 माहागाव प्रतिनिधी- संजय जाधव

फुलसांवगी येथे घडलेल्या जळीत प्रकरणातील पीडितांच्या मदती साठी फुलसांवगी कर सर्वात आधी सरसावले आहे.गावात लोक वर्गणी करून या पीडितांना व्यवसाय उभारणी साठी रोख व शिलाई मशीन वितरित करण्यात आले.

    एकमेकास साह्य करू,अवघे धरू सुपंत 
संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येक्षात कृती करून फुलसावगी गावकऱ्यांनी दाखवली आहे.28 फेब्रुवारी च्या मध्य रात्री येथील आठ दुकानाना अचानक आग लागली होती.ज्या मध्ये दोन कापड , एक किराणा, एक डेलिं निड्स व पाच टेलरिंग चे दुकान भसमसात झाले होते.या आठ ही व्यापाऱ्यांचे या आगीत मोठे आर्थिक नुकसान झालेच शिवाय उदरनिर्वाह चा साधन पण नियतीने हिरावून घेतला.या घटने संपूर्ण जिल्हाच हादरला घटनास्थळी अनेक नेते मंडळींनी भेटी दिल्या, फोटो काढले, आश्वासनाची बोळवण घातली व काढता पाय घेतला.मात्र थेट मदती पासून हे आग ग्रस्त व्यापारी वंचीत राहिले.शासकीय मदत मिळणार की नाही हा प्रश्न देखील असला तरी 'सरकारी काम अन बारा महिने थांब' या प्रमाणे ती मदत तरी कधी मिळणार? ही मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र त्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू होणे गरजे होते ही गरज हेरून येथील गावकऱ्यांनी लोक वर्गणी गोळा करणे सुरू केले त्या व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी असंख्य हात सरसावले.पाहता पाहता दीड लाख रुपये लोक वर्गणी गोळा झाली त्यातून आज एका छोटे खाणी कार्यक्रमात नुकसान ग्रस्त टेलरींग व्यवसायिकांना पाच शिलाई मशीन व इतर व्यवसाय उपयोगी साहित्य देण्यात आले तर इतर व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.सर्व प्रथम गावकरीच मदतीसाठी सरसावले आहे.
कासव गतीने चोकशी

ही आग लावून देण्याच्या संशय व्यक्त करून सय्यद सत्तार यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.मात्र तपास योग्य दिशेने होत नसल्याची खंत माजी उपसभापती विजयराव महाजन यांनी व्यक्त करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे दाद मागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad