Type Here to Get Search Results !

यवतमाळ येथील ABP MAZA प्रतिनिधी कपिल श्यामकुंवर यांचे अनोखे अभियान,मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन साक्षरता जनजागृती सायकल यात्रा

यवतमाळ येथील ABP MAZA प्रतिनिधी कपिल श्यामकुंवर यांचे अनोखे अभियान,मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन साक्षरता जनजागृती सायकल यात्रा



उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव

लोकसंख्या वाढीची गती आणि नैसर्गिक साधन संपत्तीची वाढती मागणी त्यामुळे जमिनीवर येणारा भार यातूनच मग मानव- वन्यजीव यांचा संघर्षाच्या घटना घडतात, त्यामुळे या घटना घडू नये,आपले जंगल सुरक्षित राहावे, मानव सुरक्षित राहावा, वाघ आणि अन्य वन्यप्राणी सुरक्षित राहावे यासाठी सर्वांनी एकत्र येत पुढाकार घेऊन व्यवस्थापण करावे आणि हीच भूमिका घेऊन त्याची व्यापक जनजागृती करण्यासाठी यवतमाळ येथील पत्रकार कपिल श्यामकुंवर यांनी सायकल यात्रा सुरू केली आहे. या सायकल यात्रेचे उमरखेड येथे आगमन झाले असता उमरखेड येथील पत्रकार बांधव तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले.
       
 खरे तर वाघ आहे तर जंगल सुरक्षित आहे. वाघाला आपण मित्राच्या नजरेतुन पाहावं,कुठे वन्यप्राणी यांच्याकडून शेती पिकांचं नुकसान होते, जंगलालगतची आपण आपली शेती कुठं उचलून नेऊ शकत नाही मेट्रो सिटी मध्ये ती नेता येणार नाही आणि ते शक्य नाही. आणि या सर्वामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर समजदार असलेल्या मानवाने आपल्या गरजा कमी करून जंगलावरच अवलंबित्व कसं कमी करता येईल,वन्यप्राण्यांचे अधिवास कसे अबाधित राहतील आणि मानवा सोबतच वन्यप्राणी कसे सुरक्षित राहतिल याचाही विचार करावा.आज जंगल कमी होताहेत याचाही विचार करून मानवाचा जंगलातील हस्तक्षेप कसा कमी होईल यासाठी आपण बुद्धीवादी मानवाने समजूतदार पणे कार्य केल्यास मानव-वन्यप्राणी यांच्यात संघर्ष होणार नाही, वन साक्षरता अभियानाच्या माध्यमातून लोकांनी साक्षर व्हावे, लोकांनी जागृत व्हावे इतकाच माझा प्रयत्न आहे.शाळकरी विद्यार्थी ,विद्यार्थिनी,तरुण पिढीने आणि गावकऱ्यांनी सुध्दा या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन ते गावोगावी देऊन मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी खारीचा वाटा म्हणून सायकल याञेवर निघाले आहेत.
       
उमरखेड येथे श्याम कुवर यांच्या स्वागतासाठी पत्रकार बांधव श्री राजूभाऊ गायकवाड,अझरउल्ला खाॅं,श्री अरविंदभाऊ ओझलवार, डॉ. माने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे श्री दीपक ठाकरे, श्री प्रभाकर दिघेवार ,श्री गजानन रासकर डॉक्टर अरुण बंग , श्री हनवते साहेब,श्री गजानन भारती उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News