मुरबाड तालुका कुणबी समाज महिला मंडळाच्या वतिने शुभम म्हाडसेचा गौरव !
महिलांच्या कलागुणांना वाव देत पाककला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !
मुरबाड-प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मुरबाड तालुका कुणबी समाज मंडलाच्या वतिने भव्य असा हळदी - कुंकू व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत नुकताच युक्रेन मधून सुखरुप मायदेशात परत आलेल्या शुभम म्हाडसे याचा कुटुंबासह गौरव केला. २०१६ साली स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी विवीध कार्यक्रम राबविले जात असून या वर्षी पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात संगिता संतोष परब ( केळीचे वडे ) यांना प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक कामिनी गायकवाड ( तिरंगा मोदक ) तृतीयक्रमांक भावना पाटिल ( पेरुचे सरबत ) तर उत्तेजनार्थ संगिता भेरे ( बेसन वडे) . या स्पर्धेत शहरातील अनेक महिलांनी सहभाग घेतला तर देविची आळी महिला भजन मंडळाने सादर केलेल्या द्नानोबा माऊली तुकाराम या भजनाचा ठेका धरत वातावरण भक्तीमय करुन सोडले.
या कार्यक्रमासाठी सभापती स्वरा चौधरी , नगरसेविका मधुरा सासे , रविना राव , दिक्षीता वारघडे , सुवर्णाताई ठाकरे , योगिता शिर्के , साक्षी चौधरी , शिल्पा देहेरकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा कल्पना घोलप यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव संध्या कदम , माजी अध्यक्षा ज्योति गोडांबे , छायाताई चौधरी कार्यकारणी सदस्या अर्चना विशे , संगिता साबळे , स्वाती जाधव , अॕड. वैशाली घरत , मनिषा हरड , सिमा सासे , भाग्यश्री जाधव , स्वाती राऊत , सुरेखा पवार , मंदाताई शिंदे , कल्पना पवार , कल्पना शिरोसे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला तर सुंदर कार्यक्रमाचे सुञसंचालन संध्या केदार यांनी केले.