Type Here to Get Search Results !

उमरखेड | कोकिळा च्या विवाहासाठी उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशन चा पुढाकार

कोकिळा च्या विवाहासाठी उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशन चा पुढाकार माऊली हॉस्पिटल च्या वर्धापन दिना निमित्त डॉ रावते दांपत्यांनी दिली मदत


निवघाबाजार येथुन सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे कोळी ता.हदगांव येथील रमेश जगताप यांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला असल्याने त्यांना कोणतेही काम करता येत नाही.उपन्नाचे कोणतेही साधन नाही.दोन मुली एक मुलगा पत्नी एका छोट्याशा खोलीत राहून दिवस काढीत एका मुलीचा विवाह केला दुपारी मुलगी कोकीळा चा विवाह जुळला.


ता.२५ मार्च रोजी विवाह असताना परीस्थिती मुळे काहीच साहित्य खरेदी करू शकले नसल्याची माहिती पत्रकार दिपक सुर्यवंशी यांनी बंडु माटाळकर प्रभाकर दहीभाते यांना दिली. त्यांनी खात्री करून ही माहिती उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक ठाकरे यांना दिली.


त्यांनी लगेच आपल्या ग्रुप मध्ये तातडीची मदतीसाठी आवाहन केले असता उमरखेड येथील सुप्रसिध्द बालरोगतज्ञ् डॉ.श्रीराम रावते व स्त्रीरोग तज्ज्ञ सौ.अर्चना श्रीराम रावते यांच्या माऊली हॉस्पिटल च्या स्त्री विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त गरजु कुटुंबातील विवाहाला मदत म्हणून दहा हजार रुपये मदत केली.या रक्कमेतून विवाहाला लागणारे संसार उपयोगी भांडी व अन्नधान्य साहित्य खरेदी करून २३ रोजी कोळी येथील त्या कुटुंबाला मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.दोन दिवस अगोदर भल्या पहाटे घरी आलेले साहित्य बघुन परीवाराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 



 यावेळी उद्देश सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक ठाकरे, जगदीश भुसावार, अनिल महामुने, पवण शहाणे, संदीप कदम रुईकर ,कोळी येथील सरपंच संजय कदम, वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर चौतमाल, पत्रकार बंडु माटाळकर , प्रभाकर दहीभाते, दिपक सुर्यवंशी रामराव चौतमल यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News