गोहत्याच सत्र थांबता थांबेना ! गोहत्या करण्यासाठी नेणारी इंडिका कार पाठगाव पठार येथे पलटी
गावकरी व पोलिसांच्या मदतीने व मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद जी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी जेरबंद भुलीचे इंजेक्शन देऊन जनावरांना कोंबले होते गाडीत
ठाणे- मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार
जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन चारचाकी गाडीत कोंबून चोरी करणा-या चोरट्यांना गावकऱ्यांनी पाठलाग करुन पकडून मुरबाड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार मुरबाड म्हसा परिसरातील पाटगाव बाटलीचीवाडी येथे घडला आहे
मुरबाड म्हसा परिसरातील पाटगाव बाटलीची वाडी येथे तीन चोरट्यांनी इंडीका कार मधे दोन जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन गाडीत कोंबून पळून नेत असताना गावक-यांनी त्यांचा पाठलाग केला.पाठलाग करीत असताना इंडिका कारचा टायर निखळून पडल्याने कार पलटी झाली त्यानंतर कारमधील तीघेजण जंगलात पळून गेले.
गावक-यांच्या व मुरबाड पोलिस स्टेशनच्या शोधानंतर कल्याण दुधनाका येथील खालिद गुलाम , महम्मद मुल्ला याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून अन्य दोघांना मुरबाड पोलीसांनी अटक केली आहे.या प्रकरणी तीघांना मुरबाड न्यायालयात हजर केले असता तिघांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
या सविस्तर वृत्ता बाबत मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती व प्रगत शेतकरी रामभाऊ बांगर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की जनावरेही आपल्या शेतकऱ्यांच्या पोटाचं साधन आणि आधार आहे त्यामुळे कत्तलीसाठी जाणारी जनावरे ही आपल्या भविष्याचा उदरनिर्वाहाचा साधन आहे त्यामुळे योग्य वेळी अशा भयानक कृत्यावर आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी पोलिसांच्या साह्याने अशा गो हत्या करणाऱ्या नराधमांना पोलीस कोठडी दाखवायला पाहिजे