मुळावा येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील वैश्विक विकास संस्था , मुळावा द्वारा संचालित महाराष्ट्र इंग्लिश स्कुल , मुळावा आणि पंचाकृष्ण कॉलेज मुळावा द्वारा कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात ,सोनलताई ययाती नाईक , उद्गम फौंडेशन , पुसद , प्रा.डॉ.जयमाला लाडे , सामाजिक कार्यकर्त्या ,संगीत विशारद माधुरीताई देशमुख शादाब देशमुख , संचालिका अलिशान स्कुल कावेरीताई प्रतापराव चव्हाण , पार्डी प्रियांका पोफळकर गोल्ड मेडलिस्ट ,श्री महिला बचतगट मुळावा यांचा गौरव करण्यात आला. यांचं सोहळ्यामध्ये गौरव करण्यात आला
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचे समाजात अत्यंत उल्लेखनीय कार्य आहे.त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी गौरव सोहळा आयोजित करणयात आला होता.हा कार्यक्रम सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला , कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजीव हाक्के , सकाळ चे पत्रकार आनंद सुरोशे , प्रवीण बैतलवर ,ऋषी पंडितकर , पृथ्वीराज चव्हाण , रमेश इंगोले , प्रतापराव चव्हाण , बाबाराव पोफळकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्क वाकडे , श्रुती वाकडे व आकांक्षा देशमुख यांनी केले, प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर यांनी केले तर आभार राम पवार यांनी मानले.कार्यक्रमासाठी रत्नाकर अडकीने , संतोष चेके , श्रीधर चेके आणि सर्व स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.