नागेशवाडी येथे नशामुक्त होळी महोत्सव साजरा
ऊमरखेड तालुक्यातील निंगणुर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे मा.देविदास चव्हाण...यांच्या प्रयत्नातून...नागेशवाडी ता. उमरखेड जि.यवतमाळ येथे.. शनिवार दिनांक १९ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजे पासून रात्री १० वाजे पर्यंत प्रथमच नशामुक्त होळी महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते ...मागील दोन वर्षांपासून श्री.देविदास चव्हाण...मुंबई यांच्या समाज कार्यातून व आध्यात्मिक विचाराने प्रभावित होऊन जवळपास...पाच तालुक्यातील दोन हजार बांधव नशामुक्त झाले असून हजारो माता बगिनींचे संसार उद्धवस्त होतांना वाचले आहेत...
उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे बंजारा समाज (तांडा) राहत असून मागील दहा वर्षात प्रौढ तसेच नवतरुण वर्ग सुद्धा हे व्यसनाच्या आहारी गेल्याने परिवाराची मानसिक व आर्थिक हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली होती...
अशा बिकट परिस्थितीत मा. देविदास चव्हाण यांच्या मार्गर्शनाखाली व खुप महान प्रयत्नातून... नागेशवाडी येथील बंजारा समाज तांडा पूर्ण नशामुक्त झाला असून... विदर्भ मराठवाड्यातील पंचेचाळीस गावासह दोनहजार बांधव आज नशामुक्त झाले आहेत.
तरी अशा आनंदाच्या प्रसंगी...नागेशवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन...नशामुक्त झालेल्या सर्व समाज बांधवांना एकत्र बोलवून सर्वा सोबत नशामुक्त होळी महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते ... परिसरातील,आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील सुद्धा...सर्वच जाती धर्मातील समाज बांधवांना उपस्थित रहाण्यास विनंती केली होती..
नागेशवाडी येथील सर्व ग्रामस्थ व श्री.प्रल्हाद जाधव नाईक अंकुश राठोड माजी उपसरपंच निंगणुर यांच्या कडून आवाहन करण्यात आले होते...
वरील परिवर्तन हे अध्यात्मिक सत्संगा मुळे झाले असून संत निरंकारी मिशनचे खूप मोठे योगदान आहे...संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचे वचन... 'सेन साई वेस'... 'केसूला नई गोर मोरीय' 'गोरू कोरून साई वेस' 'बार बार कोसेप दिवो लागिय'... याची प्रचिती अध्यात्मिक सत्संगा मुळे समाज बांधवांना येत आहे... या नशा मुक्त होळीला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव