Type Here to Get Search Results !

उमरखेड | महागाव | तालुक्यातील रस्ते विकास कामांनी घेतला वेग ;खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांतून १९ कोटी ४६ लक्ष निधी मंजूर

उमरखेड महागाव तालुक्यातील रस्ते विकास कामांनी घेतला वेग ;खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांतून १९ कोटी ४६ लक्ष निधी मंजूर



ऊमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव

उमरखेड/ महागाव :खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या १९ कोटी ४६ लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत पाटील यांनी केला .



तालुक्यातील चिंचोली ( संगम) बेलखेड , कळमुला, उटी, गांजेगाव , सावळेश्वर , आणि करंजी याठिकाणी कामाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले . यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम,उपजिल्हा प्रमुख बळीराम मुटकुळे,उपजिल्हा संघटक राजेश खामनेकर,माजी उपजिल्हा प्रमुख के.के.कदम,यांच्यासह आदींची उपस्थिती होती


         खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून आणि सात्यत्यपूर्ण पाठपुराव्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघात विकास कामांचा बिगुल वाजला असून मतदार संघात येणाऱ्या हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार आता कामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. पहिल्या टप्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव , हिमायतनगर तालुक्यात १६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचा शुभारंभ झाला तर दुसऱ्या टप्यात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ,महागाव तालुक्यातील १९ कोटी ४६ लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्यांचे उदघाटन करण्यात आले . यामध्ये चिंचोली ( संगम ) येथे ४७ लक्ष, बेलखेड शिवपाणंद रस्त्यासाठी ५० लक्ष , कळमुला येथील रस्त्यासाठी ५०लक्ष , उटी ते कोठारी रस्त्यासाठी ५ कोटी ९८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला हे तर गांजेगाव -सिंदगी-ब्राम्हणगाव रस्त्यासाठी ७ कोटी ५४ लक्ष ढाणकी -सावळेश्वर रस्त्यासाठी ४ कोटी ५० लक्ष तर करंजी - सावळेश्वर रस्त्याच्या कामासाठी ४६ लक्ष रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे .या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते मजबूत आणि पक्के बनवून ते शहरांशी जोडले जाणार आहेत .यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे . तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला नक्कीच गती येईल असा ठाम आत्मविश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला .           

  याकार्यक्रमाला जी.प.सदस्य डॉ.बी.एन चव्हाण,गटनेते रामराव नरवाडे, शिवसेना तालुका प्रमुख सतीश नाईक,महागाव तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,शहर प्रमुख राजू राठीड,शहर प्रमुख संदीप ठाकरे,तालुका संघटक संतोष जाधव,तालुका समन्वयक रवी रुडे,महागाव उपसभापती राम तंबाखे,नगरसेवक गजेंद्र ठाकरे,गजानन सोळके,गोपीचंद दोडके,युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे,युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश कदम,युवासेना तालुका प्रमुख कपिल चव्हाण,राहुल सोनोने,अतुल मैड, बालाजी लोखंडे,शहर प्रमुख बंटी जाधव,युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरठकर,विद्यार्थी सेना तालुका प्रमुख नितीन शिंदे,युवासेना उपतालुका प्रमुख कृष्णा जाधव,बेलखेड ग्रामपंचायत सरपंच मारोतराव कदम,गजानन शामराव सुरोशे,पुंजराम पाटील कदम,सरपंच पद्माकर पुंडे, जयणारायन नरवाडे संचाकल कृषी उत्पन्न बाजार, शिवकुमार चिंचोळकर तंटामुक्ती अद्यक्ष,गोविंदराव साखरे,राजेश सूर्य,विश्वानबर रनखांब,दिलीप सूर्य माजी सरपंच,शंकर चिंचोळकर, अरविंद लहानकार, बंडूभाऊ चिंचोळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News