उद्देश सोशल फाऊंडेशन कपडा बँक चा ६ वा वर्धापन दिन साजरा
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड येथे मागील १५ वर्षांपासून उद्देश सोशल फाउंडेशन ही संस्था उमरखेड येथे सामाजिक कार्य करत असून ह्या मध्ये विविध सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रम उद्देश सोशल फाउंडेशन संस्थेने राबविले आहेत ज्यात गणेशोत्सव मध्ये निर्माल्य(बेल,फुल, हार)चे संकलन करून कंपोस्ट खत तयार करणे, गणेशभक्तांकडून वर्गणी ऐवजी 'एक वही एक पेन' अश्या जवळपास 3000 वह्या पेनी गोळा करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप केल्या आहेत,नागपंचमी च्या दिवशी सर्पमित्रांचा सत्कार तसेच त्यांना अत्यावश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा केलेला आहे,दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलने,मतिमंद विद्यालय संस्थेने दत्तक घेतले असून तिथे उद्देश सोशल फाउंडेशन मधील सर्व सदस्यांचे व श्रीमंत लोकांच्या परिवाराचे वाढदिवस साजरे केले जातात,वाहन मुक्त दिवस,बेटि बचाओ, व्यसनमुक्ती,मतदार जनजागृती रॅली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती ला किल्ले बनवा स्पर्धा, डस्टबिन चे वाटप, पूरग्रस्तांना अन्नदान,अनाथांची माय सिंधूताई सपकाळ ह्यांचा प्रभोधनात्मक कार्यक्रम तसेच डॉ.विकास बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला स्वरानंदवन हा बहारदार कार्यक्रम उद्देश सोशल फाउंडेशन आयोजित केला होता त्यास ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला होता
उद्देश कपडा बँक ही उद्देश सोशल फाउंडेशन चा नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम असून ह्याची सुरुवात 13 मार्च 2016 रोजी दिवंगत खासदार श्री. राजीव सातव ह्यांच्या हस्ते करण्यात आली होती,
लोकांजवळील जुने कपडे जमा करून गरजू लोकांना वाटप करने, फाटक्या कपड्यांच्या कापडी पिशव्या निराधार महिलांच्या हस्ते शिवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देने, वाढदिवसा निमित्त बरेच लोक नवीन कपडे भेट देतात ते सणासुदीला गरजूंना वाटप करने ,तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली,"एक घर एक कापडी पिशवी"ही संकल्पना राबवून कॅरीबॅग मुक्ती साठी हातभार लावला उद्देश सोशल फाउंडेशन ने सर्व सामाजिक वर्धापन दिन साजरा करण्यात आला