युक्रेनहून मायदेशात परतलेल्या शुभमचे आमदार कथोरेंनी केले स्वागत !
मुरबाड-प्रतिनिधी लक्ष्मण पवार
रशिया - युक्रेन या दोन देशामधे घनघोर युद्ध सुरु असून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन मधे अडकल्याने संपूर्ण भारत देशासाठी ही बाब चिंताजनक व गंभिर असताना मुरबाड तालुक्यातील शुभम म्हाडसे हा एम. बी.बि. एस . चा विद्यार्थी शनिवारी पहाटे घरी सुखरुप परतल्याने मुरबाड करांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.
या भयंकर परिस्थिती मधे देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी मिशन आॕपरेशन गंगा राबवुन सर्व भारतीय विद्यार्थांना सुखरूप मायदेशात परत आणले . यामधे मुरबाड मधिल शुभम भाऊ म्हाडसे हा युक्रेन मधिल सुमी शहरात अडकला होता. त्याची सुटका होण्यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न सूरु होते. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी सूद्धा त्यांच्या आई - वडिलांना धिर देत शुभमला परत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले. शुभम शनिवारी पहाटे घरी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचा जिव भांड्यात पडला.
त्याच्या आईला आनंदाश्रृ अनावर झाले . मुरबाड करांनी तो घरी आल्यावर फुलांचा वर्षाव करीत , फटाके फोडून त्याचे जल्लोषात स्वागत केले. आमदार किसन कथोरे यांनीही शनिवारी शुभमची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच मुरबाड तालुका कुणबी समाज महिला मंडळाच्या वतिनेही शुभमचे स्वागत करण्यात आले असून त्याला शुभेच्छा देण्यासाठी मुरबाड करांची रिघ लागली आहे. खडतर प्रवास करून घरी सुखरुप परतल्यामुळे शुभमचे आई - वडिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी , स्थानिक आमदार किसन कथोरे , पञकार व हितचिंतकाचे आभार मानले आहेत .