अविनाशभाऊ भोईर प्रतिष्ठानचे मुरबाडमध्ये जल्लोषात उद्घाटन
उद्घाटनाला ज्येष्ठ साहित्यिक, कवी ,लेखक, दिग्दर्शक, महाराष्ट्राचा आवाज प्रेम महेश कंटे यांची उपस्थिती
मुरबाड दिनांक 14 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड शहरातील एमआयडीसी सभागृहात अविनाश भोईर यांच्या प्रतिष्ठानचे भव्य उद्घाटन पार पडले या उद्घाटनाला तालुक्यातील नामवंत ज्येष्ठ साहित्यिक ,कवी , लेखक, दिग्दर्शक, महाराष्ट्राचा आवाज फेम महेश कंटे यांनी उपस्थिती दर्शवून अविनाशभाऊ भोईर यांच्या प्रतिष्ठान ला भरभरून शुभेच्छा दिल्या
या बाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब, पीडित, सोशीत घटकाला त्यांच्या मूलभूत गरजा व अन्यायाला न्याय देण्यासाठी अविनाशभाऊ भोईर अविरत झटत आहेत ठाणे जिल्ह्यासह मुरबाड,शहापूर तसेच अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून वंचीत स्तरातील गरजवंताना मदतीचा हात देणारे मुरबाड तालुक्यातील भुवन येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भोईर यांनी अनेक तरुणांना एकत्र करून शेंकडों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुरबाड येथील सभागृहात प्रतिष्ठान ची व्यापकता वाढविण्यासाठी स्थापना करुन मोठ्या उत्साहात उद्घाटन केले यावेळी सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच या प्रतिष्ठान बाबत उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोईर यांनी सांगितले की या प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असुन भविष्यात मुरबाड,शहापूर तसेच ठाणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रा भर काम वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असुन लवकरच या प्रतिष्ठानच्या गावागावात शाखा उभारून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम हे प्रतिष्ठान करणार असल्याचे मत अविनाशभाऊ भोईर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोइर यांनी आमच्या अंबरनाथ टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक गणपत विशे तात्या, इंदवी तुळपुळे, कवी लक्ष्मण घागस , दिग्दर्शक एकनाथ देसले, आजीबाईंच्या शाळेचे मुख्याध्यापक योगेंद्र बांगर सर, आवाज महाराष्ट्राचा फेम सिंगर महेश कंटे, संजय गगे, सोष्टे सर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.