आरटीओच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- अतुल खूपसे पाटील यांची मागणी
अकलूज आरटीओ कार्यालयासह सोलापूर आरटीओ कार्यालयातील वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती. शिवाय यासंदर्भात पुणे कार्यालयावर पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबाराजे कोळेकर यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र याकडे प्रशासनाने डोळेझाक केली, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणूनच आज मोहोळ तालुक्यातील शिरापुर येथील आदमाने नामक शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वडाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अतुल खूपसे पाटील यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात आर.टी.ओ. कार्यालयाचा मोठा भ्रष्टाचार आहे. यासंदर्भात कोणत्या ठिकाणहून कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातो..? कोणत्या वाहनाकडून किती रुपये घेतले जातात..? याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सर्वविभागाची आकडेवारी पुराव्यासह आमच्याकडे आहे. त्यामुळे या सर्व लोकांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणी कडे 'तेरी भी चूप मेरी भी चूप' म्हणत दुर्लक्ष केले.
दरम्यान आज झालेल्या घटनेला पूर्णपणे आर. टी. ओ. प्रशासन जबाबदार आहे. कारण सतत दिलेल्या निवेदनात आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे कंटेनरकडून वसुली करण्यासाठी इन्स्पेक्टर राजेश आहुजा, शिवाजी सोनटक्के व चालक शिवाजी गायकवाड यांनी कंटेनरला अचानक अडवल्याने कंटेनर चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणारा आदमाने नामक शेतकरी अपघातात गतप्राण झाला. याला सर्वस्वी आर. टी. ओ. प्रशासन जबाबदार आहे.