मेट येते दहा वर्षानंतर गोर गरिबाचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार
उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मेट येते
गोरगरीब जनतेने पाहिलेले हक्काच्या घराचे स्वप्न मागील कित्येक वर्षानंतर आता पूर्ण होत आहे
त्याकरिता मेट येथील नागरिक माननीय श्री उत्तम राठोड माजी सैनिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ विक्रम भाऊ राठोड हा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अथक परिश्रमानंतर मेट येथील गोरगरिबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे
गेल्या दहा वर्षापासून कोणत्याही मेट ग्रामपंचायत मध्ये घरकुल योजना राबवण्यात आली नाही मेट या गावातील गोरगरिबांना पंतप्रधान आवास योजना ,रमाई योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, कोणत्याही योजना दहा वर्षांमध्ये राबविल्या गेले नाही ही योजना राबविण्याकरिता मेट येथील उत्तम राठोड माजी सैनिक विक्रम राठोड संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य अथक परिश्रमानंतर मेट मध्ये दहा वर्षानंतर पंतप्रधान योजनेतील घरकुलाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले
यावेळी श्री उत्तमराव राठोड मा.सैनिक तथा मा. जि.परिषद सदस्य यवतमाळ, श्री प्रेम नाईक, श्री मोहन राठोड कारभारी, श्री थावरा चव्हाण आसामी, श्री विक्रम राठोड जिल्हा उपाध्यक्ष भाजप, सौ प्रविना विक्रम राठोड सरपंच, श्री प्रकाश चव्हाण, श्री गोविंद राठोड, श्री किसन चव्हाण, श्री प्रकाश राठोड, श्री सुभाष चव्हाण ग्रा. प.सदस्य,श्री गणेश चव्हाण मा.उपसरपंच,श्री विजय चव्हाण मा.उपसरपंच, श्री गणेश चव्हाण रोजगार सेवक व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते