Type Here to Get Search Results !

कराड | आस्था सामाजिक संस्थेचा प्रा. मीनाक्षी जगदाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

कराडच्या आस्था सामाजिक संस्थेचा प्रा. मीनाक्षी जगदाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार





सोलापूर :जागतीक महिला दिनानिमीत्त कराड येथील आस्था सामाजिक संस्थेकडून अकलूज येथील प्रा. मीनाक्षी जगदाळे यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आस्था सामाजिक संस्थेकडून महिलांना सामाजिक ,ऐतिहासिक, राजकीय,वैद्यकीय, गडकोट किल्ले संवर्धन,शौर्य,आदर्श शिक्षिका, आदर्श माता, विरमाता, वकील, शैक्षणिक, उद्योजका अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ,उत्कृष्ट कामाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते




  यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्राची पाटील या होत्या प्रा मीनाक्षी जगदाळे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या या कार्याची दखल कराडच्या आस्था या सामाजिक संस्थेने घेऊन त्यांना विशेष राज्यस्तरीय पुरस्कार समारंभपूर्वक दिला त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





आस्था विशेष राज्यस्तरीय पुरस्कार ,कराड.
जागतीक महिला दिनानिमीत्त 2022, आस्था सामाजिक संस्था यांच्याकडून 30 पुरस्कार्थी महिलांना सामाजिक ,ऐतिहासिक, राजकीय,वैद्यकीय, गडकोट किल्ले संवर्धन,शौर्य,आदर्श शिक्षिका, आदर्श माता, विरमाता, वकील, शैक्षणिक, उद्योजका अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 30 महिलांना ,उत्कृष्ट कामाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 



इतर शहरातून आलेल्या,आणी आपापल्या क्षेञात उल्लेखनीय कामगिरी करण्यार्या तीस महिलांना आस्था संस्थेतर्फे
पुरस्कार देण्यात आले.






या कार्यक्रमासाठी डॉ सौ. प्राची नरेंद्र पाटील प्राणा फाउंडेशन मुंबई .. (मराठा संघ साम्राज्य बाबाराजे देशमुख सरकार ) पुणे मावळ,श्री राजेंद्र मोहिते पाटील राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद प्रदेशाध्यक्ष पुणे,सौ. रूपाली पाटील डायमंड डिझाईनर मुंबई दादर,सौ. अर्चना बर्गे नगरसेविका कोरेगाव,वैशाली भोसले जिजाई मसाले संस्थापक, श्वेता पाटील मॉडेल लंडन तसेच आस्थाचे सर्व सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad