Type Here to Get Search Results !

पुसद आगाराच्या एस टी बसला शिळोना घाटात लागली आग चालकाच्या प्रसंग सावधानतेने प्रवाशाचे वाचले प्राण

पुसद आगाराच्या एस टी बसला शिळोना घाटात लागली आग चालकाच्या प्रसंग सावधानतेने प्रवाशाचे वाचले प्राण



     प्रतिनिधी : संजय जाधव
(दिनांक 27 मार्च ) . : पुसद आगाराची बस नांदेड करिता जात असताना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिळोणा घाटात एसटी बसला आग लागली .बस क्रमांक एम एच 40 . 6170 ही बस पुसद वरून नांदेड करिता जात असतानाउन्हाच्या तडाख्यात वायरिंग च्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याचे बोलले जात आहे


 बसच्या समोरच्या भागाला अचानक लागलेल्या आगीमुळे वाहन चालकांनी रस्त्याच्या कडेला बस थांबून सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर उतरून बसमध्ये एकूण २१ प्रवासी प्रवास करीत होते सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले सुदैवाने एकही जीवित हानी झाली नाही .

सदर आगीमुळे वाहनाचा समोरचा पूर्ण भाग जळून खाक झाला आहे या घटनेमुळे चालकाने अरुण फुके यांने प्रसंगवधान राखुन गाडी बाजुला लावुन बसमधील सर्व २१ प्रवाशांना सुखरूप बाहेर गाडुन प्रवाशाचे प्राण वाचवले

 कोणतीही प्राणहानी झाली नसुन घटनेचे गांभीर्य ओळखुन पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके व त्पाचा ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले लगेच आग्नीशामन दलाला पाचारण करुण आग आटोक्यात आणली केली .अन्यथा आग घाटात लागल्या आजुबाजुला जंगल असल्यामुळे जगलाला आग लागण्याची शक्यता नाकारता येत नव्हती  
 
मंदा दत्ताजी पोटे रा. जवळी ता पुसद ह्या विद्यार्थीनीचे नर्सीग काॅलेज चे सर्व कागद पत्रे व रोख रक्कम पंचविस हजार रू. काॅलेजचे फी व भीम सुदसिग राठोड रा.पारवा तांडा ह्या प्रवाशांचे पन्रास हजारची बॅग व धान्य जळुन असे एकुण आनशी हजार रू नुकसान झाले असुन कोणतीही जिवीतहानी झाली नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad