Type Here to Get Search Results !

मुरबाड | समांतर प्रतिष्ठान आयोजित वसंतोत्सव -2022 मोठ्या उत्साहात संपन्न

समांतर प्रतिष्ठान आयोजित वसंतोत्सव -2022 मोठ्या उत्साहात संपन्न




मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार

  वसंतऋतूच्या आगमनाच्या सुखद आल्हाददायक वातावरणात, "समांतर प्रतिष्ठान" चा वसंतोत्सव-2022 दिनांक २० मार्च २०२२ रोजी कुसुमाई गार्डन, साजई, मुरबाड येथे थाटामाटात साजरा झाला. 

पुरातन नाण्यांचे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा, पारितोषिक वितरण, पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हे ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. 


विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या नऊ महिलांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. त्यांनतर रंगलेल्या काव्यवाचन स्पर्ध्येत महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या ३९ कवींनी सहभाग नोंदविला. 


ह्या काव्यवाचन स्पर्ध्येत चिंतामणी पावसे(प्रथम), दिपश्री ईसामे(द्वितीय), पुष्पांजली कर्वे (तृतीय), ,सागर निंबाळकर(उत्तेजनार्थ), अनिल सुरोशे (उत्तेजनार्थ) क्रमांकाचे मानकरी ठरले. 

काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण शहा चंदूलाल महाविद्यालय, किन्हवली मराठी भाषा प्रमुख प्रा.कवी गोपाळ वेखंडे सर व जीवनदीप महाविद्यालय, गोवेली मराठी भाषा प्रमुख प्रा. सोष्टे सर यांनी केले तर सूत्रसंचालन शरद टोहके व कविता हांडे यांनी केले.


        दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाकरिता जेष्ठ संगीतकार मा. अशोक पत्की सर, मा .आमदार मुरबाड दिगंबर विशे सर, रा.ओबीसी राज्याध्यक्ष प्रा. प्रकाश भांगरथ सर, जनसेवा टिटवाळा विजयभाऊ देशेकर, संस्थापक शांतीवन, मा. दीपक नागरगोजे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
महाराष्ट्रातील नावाजलेल्या सहा कलाकारांनी आपली नृत्य कला सादर करून ह्या कार्यमाचा रंगत खूप वाढवली. कवी प्रसाद फर्डे यांच्या 'दृष्टिकोन' ,ह्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की सर यांच्या हस्ते संपन्न झाला. 

समांतर प्रतिष्ठान, आयोजित काव्यलेखन व लघुकथा लेखन स्पर्ध्येत क्रमांक प्राप्त स्पर्धकांना पत्की सरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्री अशोकजी पत्की (मुंबई )
जेष्ठ संगीतकार यांना छत्रपती शिवाजी राजे राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार, डॉ. डि.एल. कराड (नाशिक) राष्ट्रीय उपाध्यक्ष - सी टू . कामगार संघटना यांना छत्रपती संभाजी राजे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार, श्रीम. विमल पटेकर (पालघर) (जेष्ठ समाजसेविका ) यांना सावित्रीबाई फुलेराज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार, सौ. कावेरी दिपक नागरगोजे ( संस्थापिका शांतीवन अनाथाश्रम-बीड)यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार, श्री. गोटीराम भाऊ पवार ( माजी आमदार / अध्यक्ष जनसेवा शिक्षण मंडळ ) यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार, श्री . एस आर. तोगरे (जेष्ठ समाजसेवक रायगड) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, 
श्री. टी.आर.पाटील ( अध्यक्ष शिक्षण संस्था ठाणे) यांना वीर हिराजी पाटील समाज गौरव पुरस्कार, संवेदना सामाजिक संस्था(ठाणे) यांना संत गाडगे बाबा राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार, तारांगण मतीमंद कार्यशाळा ( मुरबाड - ठाणे) यांना हुतात्मा भाई कोतवाल राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार, त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून समांतर प्रतिष्ठान कडून देण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याता अमर राऊत व व्याख्याती जागृती धलपे यांनी केले.

       ह्या संपूर्ण महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, साहित्यिक, रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समांतर प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. एकनाथ देसले सर, व सर्व शिलेदारांनी विशेष मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News