केंन्द्रीय पंचायतराज मंञी कपिल पाटिल यांची मुरबाडमध्ये पाणी टंचाई आढावा बैठक !
सरपंच ,ग्रामसेवकांसह अधिकार्यांची बैठकीला हजेरी
मुरबाड-प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाई दुर करण्यासंदर्भात केंन्द्रीय पंचायतराज राज्यमंञी कपिल पाटिल यांनी आज मुरबाड मधे आढावा बैठक घेऊन पाणी टंचाईची माहिती घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यात मागिल काही वर्षात अनेक योजना राबविल्या असल्यातरी मुरबाड करांचे हाल संपले नाहीत. काही योजना अर्धवट अवस्थेत तर काही ठेकेदाराने केलेले निकृष्ट काम तसेच ग्रामपंचायत कडे हस्तांतरण न करने व अवास्तव आलेले विज बिल या कारणाने अनेक योजना बंद आहेत त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
त्यासाठी केंन्द्र सरकारच्या जल जिवन मिशन अंतर्गत तालुक्यातील १३२ गावांना पाणी पुरवठा योजना प्रस्तावित असून या योजनेत निम्मा निधी केंन्द्राचा व निम्मा राज्यसरकारचा असणार आहे. माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट असून हर घर नळ हर घर जल अशी योजना राबविली जाणार आहे.
एप्रिल २०२२ साठी तालुक्यात ४६ गाव पाड्यांना टॕंकरने पाणी पुरवठा केला जाणार असुन ५२ इंधन विहिर मंजूर झाल्या आहेत.यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असणारा ग्रामसेवक हा ग्रामपंचायत कार्यालयात येत नसतिल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी अधिकार्यांना देऊन अधिकार्यांची ही कान उघाडणी करत ठेकेदाराची गय न करता ग्रामस्थांनी लक्ष देऊन आपल्या गावचे काम करून घेण्याचा सल्ला यावेळी मंञी महोदयांनी नागरिकांना दिला.
महावितरणच्या अधिकार्यांनी ग्रामपंचायत तसेच शेतकऱ्यांना वाढिव चुकीची बिले दिली आहेत ती दुरुस्त करून द्यावी तसेच नविन विद्युत पोल साठी ज्या शेतकऱ्यांची मागणी आहे ती तात्काळ जोडणी करण्याचे आदेश महावितरणच्या अधिकार्यांना दिले. यावेळी प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटिल , तहसिलदार संदिप आवारी , गटविकास अधिकारी रमेश अवचार , पाणीपुरवठा उपअभियंता राधेश्याम आडे , माजी सभापती रामभाऊ बांगर , जि.प. सदस्य सुभाष घरत , लियाकत शेख सर , दिपक खाटेघरे यांच्यासह ग्रामसेवक , सरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र गोडांबे सर यांनी केले