मार्गदर्शक माजी सभापती मा . श्री . रावसाहेब ( तात्या ) पराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगाव वि.का.स.सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊन
आज या संस्थेच्या चेअरमन पदी मा.श्री.पंडितदादा पराडे पाटील तर व्हा.चेअरमन पदी भारत सुर्यभान पराडे पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली .
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुळ साहेब , सह निवडणूक निर्णय अधिकारी राऊत साहेब , काकडे साहेब यांनी काम पाहिले .
या प्रसंगी माजी चेअरमन नागेश अप्पा पराडे पाटील , डॉ भास्कर पराडे पाटील सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते .