पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 हिमायतनगर येथे फुलले नंदवन . डॉक्टर उमेश सोनटक्के यांचा अभिनव उपक्रम
हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/
तालुक्यातील हिमायतनगर शहरात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले डॉक्टर सोनटक्के हे पदभार स्वीकारल्यापासून विविध उपक्रम राबवत असून याबाबत शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे .
लोकसहभागातून केलेली कामे.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रे 1 हिमायतनगर रंगरगोटी, बोकल्या भिंती
पशु करिता पाणी व्यवस्था : बोर मोटर,पाईपलाईन दवाखाना परिसर सुशोभी करण,आयुर्वेदिक वृक्ष लागवड व गार्डन
शेतकऱ्यांना पिण्याच्या पाणी व्यवस्था RO वॉटर दवाखान्यात CCTV कॅमेरा यासह आदी उपक्रम सोनटक्के यांनी लोकसभातुन करतात यापुढे सुद्धा विविध उपक्रम राबवण्याच विडा उचलला असून एकेकाळी ऊकीरडण्याचे स्वरूप आलेल्या दवाखाना सध्या स्थिती वनराईने नटलेला दिसत असून विशेष म्हणजे दवाखान्याची स्वच्छता. एवढ्यावरच न थांबता चक्क शासकीय सुटीच्या दिवशी सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यास कुठल्याही पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या बाबतीत फोन केल्यास तात्काळ सेवा देत आहेत यांचे कार्य वाखाण्याजोगे असून .
विशेष म्हणजे कोरोणा माहामारीच्या काळात शासनस्तरावरून कोरोणा बाबत लस घेण्याचे आव्हान करण्यात येत होते. त्यावेळी डॉक्टर उमेश सोनटक्के यांनी शासकीय कामात योगदान मिळावे व जास्तीत जास्त कोरोणा लसिकरण व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून लसीकरण केलेल्या पशुपालकांच्या जनावरावर मोफत उपचार व औषध सुद्धा देण्यात आले होते .
या सर्व बाबीचा विचार करून जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दखल घेऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी पशु प्रेमी नागरिकातून होत आहे. एवढेच काय तर नुकतेच पंचायतराज समितीने सदरील पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन पाहणी केली व प्रशंशा केली. पुढील कार्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी. सामाजिक संस्था. व पुढाऱ्यांनी. सदर लोकाभिमुख उपक्रमास योगदान द्यावे अशी मागणी पशुपालक .व पशू प्रेमी नागरिकातून समोर येत आहे