Type Here to Get Search Results !

निगंनुर जि.प.शाळेतील शिक्षकांना वेळेचा विसर

                      निगंनुर जि.प.शाळेतील शिक्षकांना वेळेचा विसर 


प्रतिनिधी निगंनुर :- मैनोदिन सौदागर 
उमरखेड तालुक्यातील निगंनुर परिसरात मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. नेमके कोरोनाची संख्या आटोक्यात आली असल्याने पहिली ते सातवीचे वर्ग भरण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र निगंनुर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रोज उशीरा येत असल्याचा प्रकार समोर येत आहे.काही शिक्षक दहा वाजता शाळेत हजर होतात, तर काही दुपारी घरी निघून जातात. यावरुन या शाळेतील शिक्षकांना वेळेचा विसर पडला की काय असे दिसून येते


उशीरा येणाऱ्या शिक्षकांवर कुणाचाच अंकुश नसल्यामुळे हे असले प्रकार घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे. शिक्षकांचा अलगर्जीपणामुळे शाळा भरते कधी हेच कळायला मार्ग नाही. शाळेला काही टाइमटेबल आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


निगंनुर परिसरातील शाळेतील शिक्षक हॉटेलमध्ये तर कधी चक्क पाणठेल्यावरती गप्पा मारत बसत असल्याचे आढळून आले आहेत याकडे वरिष्ट अधिकार्‍याने लक्ष देऊन कार्यवाहि करण्यात यावी असे पालकांन कडून म्हटले जात आहे. 


कोरोना काळात शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास घेतले नसल्याची खंतही पालंकांतून व्यक्त होत आहे . ग्रामीण भागातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. 


प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मोठी फी भरून विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवित आहे. उलट गावात मिळणाऱ्या नि:शुल्क शिक्षणासाठी पालक उदासीन आहे. 


जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश आणि मध्यान्ह भोजनही दिले जाते. परंतु पालक याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे 


याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा होय. हा दर्जा का ढासळत गेला, याचे कुणीही चिंतन करताना दिसत नाही. शिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष आसल्या मुळे निगंनुर परिसरात ग्रामीण भागातील जिल्हा प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा रामभरोसे सुरू आहे. . शिक्षण अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शाळेवर लक्ष देण्याची गरज.पालकवर्गाची मागणी आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad