Type Here to Get Search Results !

चंद्रपूर भारतीय स्टेट बँकेला 14 कोटी 27 लाख रुपयांचा गंडा,काही राजकीय नेते व प्रतिष्ठित महिला अडकण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चआ

चंद्रपूर भारतीय स्टेट बँकेला 14 कोटी 27 लाख रुपयांचा गंडा

काही राजकीय नेते व प्रतिष्ठित महिला अडकण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा



चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

मोठमोठ्या उद्योगपती कडून बँकांना अब्जावधींचा गंडा घालुन कर्जाची परतफेड न करता परदेशात पळून जाण्याची प्रकरणे उजेडात आली असुन ह्या घोटाळेबाज लोकांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले असतानाच चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय स्टेट बँकेला बनावट प्राप्तिकर परतव्याचे विवरणपत्र सादर करून तब्बल 14,26,61,700 रुपयांनी गंडा घालणाऱ्यापैकी तब्बल 11 कर्जधारक एजंट 01 व बॅकेंचे 03 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी 4 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांना पत्र व ई मेल द्वारे सदर घोटाळ्याची तक्रार दिली होती व यासंदर्भात चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन घोटाळा उघड केला होता. राजीव कक्कड ह्यांच्या तक्रारीवरून भारतीय स्टेट बँकेने पोलीस तक्रार दाखल केली तसेच अंतर्गत चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक संजोग भ भागवतकर ह्यांनी रामनगर पोलीस स्टेशनला दिनांक 08/03/2020 रोजी लेखी तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क. 267 / 2020 कलम 420, 406, 409, 417, 420, 465, 466, 467, 468, 471,120 (ब)भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल झाला.


पोलिसांनी केलेल्या चौकशीत चंद्रपुर जिल्हयातील स्टेट बँक ऑफ इंडीया कडे 44 कर्ज प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंट मार्फत गृह कर्जासाठी अर्ज केले. सदर प्रकरणी कर्ज प्ररकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्यांकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्जामध्ये वाटप झाले असल्याचे सिद्ध झाले. सदर कर्जवाटप प्रक्रियेत एकुण 14,26,61,700/ रू. ने बँकेची फसवणुक झाल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तकार दाखल केली होती, त्यानुसार प्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे.

सदर गुन्हयाचा तपासात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून बँकेस सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात एकुण 11 कर्जधारक एजंट 01 व बॅकेंचे 03 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे.

अटक करण्यात आलेल्या घोटाळेबाज लोकांत

१. श्वेता महेश रामटेके वय ४२ वर्ष धंदा मजुरी रा. पंचशिल चौक वार्ड क्र. १ बाबुपेठ चंद्रपूर

२. वंदना विजयकुमार बोरकर वय ४० वर्ष धंदा मजुरी रा.नगिनाबाग चोर खिडकी जवळ चंद्रपूर


 
३. सौ. योजना शरद तिरणकर वय ४२ वर्ष धंदा व्यापार रा. डिसके ग्रिन डुप्लेक्स नं. २५ म्हाडा कालनी दाताळा चंद्रपूर


 
४. शालिनी मनिष रामटेके वय ४५ वर्ष रा. धंदा व्यापार रा भंगाराम वार्ड भद्रावती

५. मनिष बलदेव रामटेके वय ४७ वर्ष धंदा व्यापार रा. भंगाराम वार्ड भद्रावती

६. मनिषा विशाल बोरकर धंदा कॅटरींग रा. आंबेडकर वार्ड भद्रावती

७. वृंदा कवडु आत्राम वय ४९ वर्ष धंदा दुकान रा. डिसके कॉलनी बोर्डा वरोरा ता. वरोरा


 
८. राहुल विनय रॉय वय ३६ वर्ष धंदा दुकान रा. हॉटेमट कॉलनी माजरी

९. गजानन दिवाकर बंडावार वय ३९ वर्ष रा. धाबा,

१०. राकेशकुमार रामकरण सिंग वय ४२ वर्ष रा. सास्ती राजुरा

११. गणेश देवराव नैताम वय ३६ वर्ष रा. पोंभुर्णा ह.मु. कोसारा

१२. गिता गंगादिन जागेट वय ५३ वर्ष रा. घुग्घुस

१३. पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी वय ३९ वर्ष रा. ह.मु. प्लॉट निर्माण नगर तुकुम चंद्रपूर मुळ पत्ता प्लाटॅन ९१ बंडु सोनी लेआउट परसोडी नागपूर

१४ विनोद केशवराव लाटेलवार वय ३८ वर्ष रा. ह. मु. हनुमान नगर तुकूम चंद्रपूर मुळ पत्ता वार्ड क्र. ४ सावली ता. सावली जि. चंद्रपूर,

१५ .देवीदास श्रीनिवासराव कुळकणी वय ५७ वर्ष रा. मुकूंदनगर अकोला मुळ पत्ता बादुले बुद्रुक ता. अक्कलकोट जि. सोलापुर ह्यांचा समवेश असून या प्रकरणात भद्रावतील राजकीय नेते तथा प्रतिष्ठित महिला सुध्दा गुंतल्या असल्याची चर्चा असुन पोलीस लवकरच त्यांना सुद्धा गजाआड करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी कळविले आहे.

सदर प्रकरण पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिपक मस्के (आर्थिक गुन्हे शाखा) अधिक तपास करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad