Pune crime | बेसमेंटची जाळी कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू , कंत्राटदारावर गुन्हा दाखल ...
पुणे : पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत . तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली . या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले .
येरवडा येथील शास्त्रीनगर येथे स्लॅबचे काम सुरु असताना लोखंडी सांगडा खाली कोसळून त्यात ५ जणांचा मृत्यु झाला तर ४ कामगार जखमी झाले . या दुर्घटनेच्या ठिकाणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज सकाळी भेट दिली . त्यानंतर त्यांनी सांगितले की , पोलिसांनी हलगर्जीपणा केलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे
. संबंधित तिघांना ताब्यात घेतले आहे . नेमका कसा प्रकार घडल . याची चौकशी केली जात आहे . वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते . त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून , त्यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले . त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत .