स्वतंत्र संपादक पत्रकार संघ, भारत यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.... अण्णा पंडीत
कल्याण (प्रतिनिधी) लक्ष्मण पवार
- स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नामदेव पां. शेलार यांनी जेष्ठ पत्रकार तथा मानवाधिकार संरक्षक महेंद्र यशवंत पंडित (अण्णा पंडित) यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या *राष्ट्रीय निरीक्षक* पदी नियुक्ती केली आहे.
अण्णासाहेब पंडीत यांचे सामाजिक कार्य आणि पत्रकारीते मधील योगदान याची दखल घेऊन त्यांची पत्रकार संघाच्या राष्ट्रीय निरीक्षक पदी नियुक्ती केली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी सांगितले.
गरजवंत, वंचित, पिडीतांच्या हाकेला धावुन जाणारा एक सच्चा व आक्रमक समाजसेवक, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा कलमकसाई अशी ज्यांची ख्याती आहे आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या राष्ट्रपुरुष, राष्ट्रमाता आणि राष्ट्रसंताचा आदर्श घेऊन समाजातील विविध स्तरांवर कार्यतत्पर असणारे अण्णासाहेब पंडीत हे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. या अराजकीय सामाजिक संघटनेचे विद्यमान प्रदेश-सरचिटणीस आहेत. तसेच श्रमिक (मु) पत्रकार संघाचे ते ठाणे-जिल्हाध्यक्ष आहेत. शासकीय / प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचे कार्यशैलीचा प्रभाव असुन अण्णा पंडित सामाजिक अत्याचाराबाबतच्या घटनेत अनेक पिडीतांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. वंचित पिडीत दलित आदिवासी आणि बहुजनांच्या विविध प्रकरणांवर त्यांचेवरील अन्याय अत्याचारा वर त्यांनी आवाज उठवला आहे. सातत्याने पाठपुरावा केला आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी अण्णा पंडित यांना राष्ट्रीय निरीक्षक पदी नियुक्ती देवुन संघटनेची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे.
पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. अण्णा पंडीत हे स्वतः पत्रकार असल्याने त्यांना पत्रकारांच्या अडीअडचणींची आणि समस्यांची योग्य जाण असून ते आपल्या पदाला योग्य न्याय देतील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. संघाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही माझ्या बांधवांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव बांधिल आहे असे प्रतिपादन अण्णा पंडीत यांनी केले आहे, त्यांच्या नियुक्ती मुळे पत्रकार क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात असून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या मान्यवर पदाधिका-यांसह श्रमिक (मु) पत्रकार संघ, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके, रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव, अमोल कांबळे (खारघर) अंबरनाथ तालुका अध्यक्षा माया आहीरे, निर्मला गहलोत, अंबरनाथ शहर अध्यक्षा गायत्री चव्हाण, राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ, प्रा.प्रेमलता जाधव, रवि गमरे (कल्याण), सागर शिंदे (कल्याण) अजीत इंगळे (ठाणे),प्रशांत जाधव (भिवंडी) कामगार नेते महादेव वाघमारे (पनवेल) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव गायकवाड (पनवेल) संजय गायकवाड (अध्यक्ष शिक्षक स्वाभिमानी संघटना), डॉ. अमित दुखंडे. (आधार इंडिया परिवर्तन संघटना) अण्णासाहेब रोकडे (आरपीआय राज्य उपाध्यक्ष) मिलींद बेळमकर (आरपीआय,(आं) ठाणे जिल्हाध्यक्ष) पत्रकार राजेश ऊंडी,(मुंबई) पत्रकार तुकाराम म्हस्के,(नवी मुंबई) संपादक सचिन बुटाला,पत्रकार प्रितम शहा (पुणे) पत्रकार तथा प्राचार्य योगेश गोसावी (नासिक) इत्यादी मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव करून अण्णासाहेब पंडीत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.