श्रीपुर प्रतिनिधी :
महाळुंग ते वेळापूर हा रस्ता गेली बर्याच दिवसांपासून खराब अवस्थेत होता निवेदनाच्या झटक्याने रस्ता दुरुस्ती करण्याचे काम जोरात सुरु झाले आहे
महाळुंग ते वेळापूर रस्ता दुरुस्त त्वरीत करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष शिवराम गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रेय मामा भरणे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते व सातत्याने विचारणा केली जात होती व आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेऊन त्यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांना समज दिल्याने रस्त्याचे कामाला गती मिळाली आहे
अंदाजे १०-१५ वर्षांपासूनचा हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता, शेतकरी-कामगार वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले आहे