आमदार संजय मामा शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार प्रशांत परिचारक यांची उपस्थिती
मात्र यंदा माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर झालेल्या हुरडा पार्टी आणि बैठकीत ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे व माजी मंत्री दिलीप सोपल या दोन नेत्यांवर जबाबदारी आणि नेतृत्व सोपवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, सांगोल्याचे नेते चंद्रकांत देशमुख, मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे, पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्यासह विशेष उपस्थिती होती ती म्हणजे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची.
बऱ्याच दिवसांनंतर प्रशांत मालक संजयमामा यांच्यासोबत दिसून आले. या बैठकीमध्ये जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे नियोजन आहे तसेच 17 जागांपैकी कोणत्या तालुक्याला किती जागा द्यायच्या हेसुद्धा निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. निवडणुकीचा अर्ज छाननीीमध्ये दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप माने यांचा अर्ज मात्र बाद ठरविण्यात आला आहे. त्यांनी विभागीय उपनिबंधक डेअरी यांच्याकडे अपील केले आहे त्या अपिलाचा अद्यापही निर्णय झालेला नाही. यावरून आता दिलीप माने यांना संचालक पद मिळणार का? असा प्रश्न असून उत्तर, दक्षिण आणि अक्कलकोट या तालुक्यातून एक संचालक दूध संघाला दरवर्षी बदलून दिला जातो या वेळी ती जागा कोणाला जाणार याचीही उत्सुकता लागली आहे