करकंब प्रतिनिधी: सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पडघम वाजू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यातील विशेषता सोलापूर जिल्हा परिषदेत नेहमीच करकंब जिल्हा परिषद गटातील झेंडा जिल्ह्याचे श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक वअभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषद गटातील सामान्य मतदारांनी विश्वासास पात्र राहून सातत्याने आज पर्यंत साथ दिली. यामुळेच या जिल्हा परिषद गटातून यापूर्वी माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील श्रीमंत सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून यापूर्वी करकंब जिल्हा परिषद गटातून बाबुराव जाधव, सुमनताई नेहत्रराव यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची (राज्यमंत्री दर्जा) मोठी संधी दिली.नंतरही करकंब या जिल्हा परिषद गटातून रजनीताई देशमुख यांना जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण हे सर्वात मोठे पद दिले. करकंब जिल्हा परिषद गटासाठी दोनदा जिल्हा परिषद अध्यक्षपद, एकदा महिला बालकल्याण सभापतिपद देण्याची मोठी निर्णायक भूमिका घेतली होती.
सध्या करकंब जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य कार्यकर्ता तील नेता म्हणून युवक नेते प्रणव मालक परिचारक हे सध्या या करकंब जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. आज पर्यंत या करकंब जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य मतदारांनी पांडुरंग परिवारातील या ज्येष्ठ नेतेमंडळींच्या त्या त्या वेळच्या भूमिकेमुळे ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सहजरीत्या जिंकल्या. पण सध्या जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक हे विशेषता मंगळवेढा-व पंढरपूर शहर आणि जिल्हा राज्य या कार्यात मग्न असल्यामुळे त्यांना अगदी गुरसाळे ते करोळे पर्यंत या भागाकडे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ते तर सोडाच, ज्यांनी ज्यांनी आज पर्यंत त्यांना अनमोल अशी मोलाची साथ सहकार्य केलेले हितचिंतक कार्यकर्ते नेतेमंडळी त्यातच पांडुरंग परिवारातील असलेले कार्यकर्ते नेते यांना भेटणे तर सोडाच साधी विचारपूसही केली जात नसल्याची खंत निर्माण झाल्याची भावना झाल्यामुळे गुरसाळे ते करोळे या सर्वच भागातील येणार्या जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. जरी युवक नेते प्रणव मालक परिचारक हे या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असतील तर त्यांच्यासाठी ही निवडणूक डेंजर झोनअसणार असून जरी कितीतरी वरून पांडुरंग -पांडुरंग परिवार केला तरी ही सध्या अंतर्गत मात्र विठ्ठल -विठ्ठला असा आवाज ऐकू येत असल्याची चर्चा या जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून सुरू आहे.
सर्व सामान्यातील कार्यकर्ता तील नेता म्हणून युवक नेते प्रणव मालक परिचारक हे सर्वांना सुपरिचित आहेत .अगदी ते सामान्यातील सामान्य तळागाळातील कार्यकर्ता असो नेता असो की शेतकरी, कष्टकरी ,अगदी वंचित असलेल्या लोकांना ही आतापर्यंत सर्वांना एकत्रित बरोबर घेण्याची जबाबदारी घेण्याची ताकद व सर्वांना योग्य न्याय देण्याची भूमिका आणि संवादाने सर्वांना बरोबर घेऊन काम करून घेण्याची प्रेरणा युवक नेते प्रणव परिचारक यांची ही निस्वार्थ भावना सध्या युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. युवकांमध्ये ही या जिल्हा परिषद गटातून नेते प्रणव परिचारक यांनी ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा ही केली जात असून त्यामुळे या पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात युवक नेते प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून युवक वर्ग कष्टकरी कामगार शेतकरी व सामान्य कार्यकर्ता तसेच सर्वच नेतेमंडळींना निश्चित न्याय मिळेल असे बोलले जात आहे. असे असले तरी करकंब जिल्हा परिषद गटातून जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.