महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
महागाव : नुकतीच निवडणूक झालेल्या महागाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवकांचा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महागाव तालुका शिवसेना पदाधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील नगरपंचायतीची निवडणूक पार पडली हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महागाव,सेनगाव,औंढा,माहूर येथे शिवसेनेने बाजी मारत भगवा फडकवला.महागाव येथील नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे रामराव पाटील नरवाडे,प्रमोद
(शाखा )भरवाडे,विशाल पांडे,नारायण शिरबीरे,सुनीता डाखोरे हे ५ उमेदवार बहुमताने विजयी झाले.विजयी झालेल्या नगरसेवकांची आज (दि.५ ) रोजी महागाव येथे खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.केला व शिवसेनेचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महागाव तालुका शिवसेना पदाधिकारी जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जि. प.सदस्य चितांगराव कदम,उपजिल्हा प्रमुख बळीराम मुटकुळे,जि.प.सदस्य डॉ.बी.एन.चव्हाण,माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे,उपजिल्हा संघटक राजेश खामनेकर,सामाजिक कार्यकर्ते जगदीश नरवाडे,शहर प्रमुख राजू राठोड,उदय नरवाडे,उमरखेड तालुका प्रमुख सतीश नाईक,युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश कदम,युवासेना तालुका प्रमुख कपिल चव्हाण,उमरखेड शहर प्रमुख संदीप ठाकरे,विजय पाटील,शिवाजी डाखोरे,ओम कुसुमवार, पवन राठोड यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.