जागर स्वच्छता अभियान, करकंब व करकंब ग्रामस्थ यांचा संकल्प
करकंब प्रतिनिधी: येथील जागर स्वच्छता अभियान करकंब ग्रामस्थ यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या करकंब गाव स्वच्छता अभियानाचा शुभारंभ उद्या दिनांक-६ रोजी दुपारी ४ वाजता श्री गणेश मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल शेजारी गणेश टेकडी येथे संपन्न होणार आहे
या जागर स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमास कर्जत नगर पंचायतचे मुख्य अधिकारी गोविंद
जाधव हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. जागर स्वच्छता अभियानांतर्गत आपले आरोग्य चांगलं रहावस वाटतं, आपला हक्क हवा हवासा वाटतो. पण मात्र आपले कर्तव्य मात्र विसरून जातो. म्हणूनच या निस्वार्थ भावनेतून करकंब गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करकंब ग्रामस्थांच्या सहभागातून राबवून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक वेगळा पॅटर्न या माध्यमातून निर्माण होईल.