शासकीय प्रत्येक खात्यातील तात्काळ नवीन पदांकरीता नोकरभरती करा व कोरोना काळातील राहिलेल्या परिक्षा घेणेत याव्यात ही स्वाभिमानीची शेतकरी संघटनेने केली मागणी
सरकारी खात्यांतील रिक्त जागांसाठी नोकरभरती करा व कोरोना काळातील राहिलेल्या परिक्षा घेणेत याव्यात यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि महाराष्ट्र राज्य हे प्रगतिच्या दिशेने वाटचाल करत असताना युवकांना नोकरी व सरकारला पुरेशा मनुष्यबळ आवश्यक असते , सध्या सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. युवक वर्ग हे राज्याची आर्थिक स्थिती सुधारू शकतात कोरोना काळातील (मागील तीन वर्षापासून) महापरिक्षा पोर्टल द्व्यारे घेण्यात येणारे या भरती परीक्षास शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. मधल्या काळात लोकसभा निवडणुक आचारसंहिता,अतिवृष्टी,महापूर ,विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आणि आता कोरोना या कारणामुळे प्रत्येक वेळी परीक्षा पुढे-पुढे ढकलल्या जात आहेत तसेच ज्या परीक्षा होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात अशा कारणांमुळे परिक्षा घेण्यात आलेल्या नाहीत.
या सर्व गोष्टी पाहता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींच्या वयोमर्यादा कालावधी निघून जात आहे तसेच मानसिक ताण तणावाला त्रासाला बळी पडत आहेत.परिणामी विद्यार्थ्यांचे बेकारीचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे रिक्त जागांसाठी व नवीन पदभरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या दृष्टीने नियमावलीत तीन ते पाच वर्षांचा कालावधी वाढवून मिळावा तसेच कोरोना काळातील भरलेल्या फॉर्मची परीक्षा आता आदेश काढून वेळापत्रक जाहीर करून तात्काळ परीक्षा घेण्यात याव्यात आणि नवीन पदांसाठीही आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना सर्वोत्तपरी सहकार्य करावे तसेच येणार्या काळात शासनाने दखल न घेतल्यास वेळप्रसंगी बेरोजगारांचे आंदोलन उभे करण्यात येईल असाही इशारा यावेळी शिवराम गायकवाड यांनी दिला