Type Here to Get Search Results !

कल्याण मध्ये शंखेश्वर प्रेसिडेन्सी मित्र मंडळ,बजरंग शांताराम तांगडकर मित्र मंडळ व स्फूर्ती फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने भव्य शिवजयंती उत्सव संपन्न !

कल्याण मध्ये शंखेश्वर प्रेसिडेन्सी मित्र मंडळ,बजरंग शांताराम तांगडकर मित्र मंडळ व स्फूर्ती फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने भव्य शिवजयंती उत्सव संपन्न !



 मुरबाड प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार

हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कल्याण पश्चिम येथे शंखेश्वर मित्र मंडळ टावरी पाडा (गौरीपाडा )कल्याण प. तसेच स्फूर्ती फाउंडेशन व श्री.बजरंग शांताराम तांगडकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय उत्साहात व थाटात संपन्न झाली या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिर,चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी ,अल्प दरात रक्त तपासणी ,रोजगार मेळावा ,रोजगाराच्या शोधात असलेल्या तरूण तरूणींना मोफत संकणक प्रशिक्षण,मोफत इंग्लिश स्पिकींग,मोफत मुलाखत प्रक्षिक्षण नाव नोंदणी ,तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम ज्यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रम व कल्याण पूर्व मधील झिरो डान्स अकॅडमी ने नृत्य अविष्काराने विविध विषयांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली 


तसेच शिवभक्तांसाठी यावेळी शिवप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये भाजपा कल्याण पश्चिम माजी आमदार नरेंद्र पवार ,शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे,कल्याण जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे ,प्रदेश सचिव प्रिया शर्मा,मनसे माजी आमदार प्रकाश भोईर,शिवसेना कल्याण पश्‍चिम विधानसभा संघटक मा.सभागृह नेतेअरविंद मोरे,माजी नगरसेवक दया गायकवाड,कल्याण शहर उपसंघटक दादासाहेब महाले ,झेप प्रतिष्ठान अध्यक्ष-विकास धनावडे,मा.नगरसेवक अर्जुन भोईर, मा.नगरसेवक अरविंद पोटे,मा.नगरसेवक जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर,महिला अध्यक्ष शितल विखनकर, श्याम मिरकुटे,भगवान म्हात्रे ,कल्याण युवा सेना अधिकारी अनिरुद्ध पाटील ,महेश पाटील ,कल्याण उपशहर अधिकारी किशोर महाले,खडकपाडा पोलिस अधिकारी,सिंमा सिंग ,विजया जाधव,कल्पना पिल्ले,त्रिलोक सिंग,संगिता पाटील,पोर्णीमा मोरे,शिल्पा बुरगुडा सह पत्रकार बांधव महादेव पंजाबी ,अक्षय शिंदे,इमतियाझ खान,रेखा मोरे व इत्तर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत पात्रे,जितेंद्र सोनावणे,अशोक खंडागळे, अर्जुन बिराजदार,अमित पवार,विनोद शेलकर,विशाल दामले,भरत पाटील,तरूण भानुशाली,कोमल पुसाम,अरूण निमगिरे,सुरज पगारे,योगेश जगदाळे,सुनिल तांगडकर,विजय निकम,शांताराम झावरे,स्वप्निल सागरकर,दिलीप सिंग,हरिष शिंदे,विवेक हरद,सेल्वकुमार,राम सुंबे, संकेत शिंदे ,अमोल वाकळे ,विवेक हरद संजय घुडे ,नंदकुमार कदम ,मंजू दास राठोड, जगदीश धांडे , हेमंत शिंदे ,आर.के वसाने, राजेश काळे विशाल दामले सुनील चव्हाण मनोज कुमार,अॅड योगेंद्र शिरवाडकर,घाणेकर,निलेश डुंबरे,योगेश सिंग,अॅड शशी नागप,वैभव केदारे,नागेश ,विशाल जगताप, भिल्ला पाटील,अभिनव,बेडसे,पार्थ सोनावणे,नागेश,विदिशा सोनवणे रश्मी काकडे ,ज्योती बिराजदार,हर्षलता सागरकर,सुजाता निमगिरे, रिनल शिंपी, सारिका झावरे ,शारदा तांगडकर,सोनल तांगडकर ,सिमा तांगडकर यांनी मेहनत घेतली

पाहुण्यांचे स्वागत भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष व स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांनी केले सूत्र संचालन विनोद शेलकर यांनी केले तर पैठणी खेळाचे सुत्रसंचालन श्री. प्रणव भांबुरे
सुप्रसिद्ध निवेदक
मराठी कलाकार यांनी केले,
 जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी आभार व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad