Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त इटावा वॉर्ड येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त इटावा वॉर्ड येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न



यवतमाळ प्रतिनिधी :-संजय जाधव


बंजारा समजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज व रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त स्थानिक इटावा वॉर्डातील तरुण उत्साही व सामजिक कार्याचा वसा घेतलेले मित्र मंडळ यांनी दी 19/02/2022 रोजी इटावा वॉर्ड येथील मैनाबाई नगर येथील हनुमान मंदीरा मध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी व शतरक्रिया शिबिराचं आयोजन केले होते.या नेत्र तपासणी शिबिरात 369 लोकांची डोळे तपासण्यात आले व 24 लोकांची शत्राक्रिया साठी निवड करण्यात आली या शिबिरासाठी नांदेड येथील डॉ शेख साहेब व त्यांच्या चमुने तपासणी साठी सहभाग दिला व त्यांच्या योगदानाबद्दल इटावा वॉर्ड मित्र मंडळाने त्यांचा सत्कार करून आभार वक्त केले

इटावा वॉर्डतील सदर मित्र मंडळाचे युवक ऋषीकेश पंडितकर विकी राठोड यांच्या समवेत अमर बिजमवार,राम राठोड,श्रीकांत निंबेकर,सचिन राठोड,प्रसाद हतमोडे,आशिष घुगे,आदित्य डंबोळे,पवन वऱ्हाडे,किशोर पवार,सागर जाधव,बिपिन हरणे, विनोद गिरी सव्यम प्रेरणेने सामाजिक उपक्रम राबवत असून या नेत्र तपासणी शिबिरामुळे इटावा वार्डतील नेत्र रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सदर नेत्र शिबिरात वॉर्डातील महिला सह पुरुष व युवकांनी ही नेत्र तपासणी केली हे विशेष सदर शिबिर हे सकाळी 10 पासून सायंकाळी 8 वाजे पर्यंत चालले सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी वॉर्डातील अनेक तरुणांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad