Type Here to Get Search Results !

मुरबाडच्या राजकीय वर्तुळात मारवाडी समाजाचे नरेश जाखोटिया स्वीकृत नगरसेवक

मुरबाडच्या राजकीय वर्तुळात मारवाडी समाजाचे नरेश जाखोटिया स्वीकृत नगरसेवक





  मुरबाड प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार


 

  मुरबाड शहरातील अल्प संख्यांक मारवाडी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी व समाजाभिमुख व्यक्तीमत्व नरेशशेठ जाखोटिया यांची मुरबाड नगरपंचायतीच्या स्विकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे. नरेश जाखोटिया हे मुरबाड मधिल भारतीय जनता पार्टिच्या प्रवासी वाहतुक संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच आमदार किसन कथोरे यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात. जाखोटिया हे मुरबाड शहरातील नावाजलेले व्यापारी म्हणुन ओळख आहे. ते अनेक वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने त्यांच्या कामाची दखल आमदार कथोरे यांनी घेऊन त्यांची निवड केली. आजपर्यंत मुरबाडच्या राजकीय ईतिहासात प्रथमताच अल्पसंख्याक मारवाडी समाजाला मुरबाड नगरपंचायत मधे प्रतिनिधित्व देऊन संधी दिली असल्याने आमदार कथोरे यांचे सर्व समावेशक राजकारण यावेळी पून्हा एकदा दिसून आले आहे.   


  आमदार किसन कथोरे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो शंभर टक्के मी सार्थ करुन विकासाच्या सोबत राहिन. आमच्या समाजाला न्याय दिल्याने मी त्यांचे शतःशा आभारी असल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव , सरचिटणीस नितीन मोहपे , नगराध्यक्ष राम दुधाळे , उपनगराध्यक्षा मानसी मनोज देसले, निवडणुक निर्णय आधिकारी अभिजित भांडे पाटिल , साहाय्यक निवडणुक अधिकारी परितोष कंकाळ तसेच सर्व भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad