Type Here to Get Search Results !

गजानन महाराज प्रगट दिन म्हणजे श्रींच्या भक्तांना दिवाळीचा सणच

गजानन महाराज प्रगट दिन म्हणजे श्रींच्या भक्तांना दिवाळीचा सणच







  समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या पावन पदस्पर्श मुळे शेगाव नगरीला विदर्भाची पंढरी म्हणून पूर्ण जगभरामध्ये आगळी वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे गजानन महाराजांवर भाविकांची नितांत श्रद्धा आहे आज श्रींचा प्रगटदिन उत्सव सोहळा म्हटला की पूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांची भक्तगण मंडळी हा दिवस आपल्या घरी दिवाळीच्या सणा सारखा साजरा करतात समर्थ सद्गुरु गजानन महाराज माघ शुद्ध सप्तमी ला शेगाव नगरामध्ये प्रगट झाले आणि देविदास बुवा पातुरकर यांच्या घराच्या समोर वटवृक्षाच्या पुढे ऊष्ट्या पत्रवाड्या पडलेल्या होत्या त्यावरील भाताचे शीत वेचून खात होते नवल हे आहे की ज्या योगी महात्म्याने भाताची ऊष्टी शीते वेचून खाल्ले आज त्यांच्या नावाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रकट दिनाच्या दिवसाला जागोजागी अन्नक्षेत्रालय चालवले जातात. 


हजारो भक्त श्रींच्या दर्शनाला श्रीक्षेत्र शेगाव येथे पायदळ पालखी सोहळा घेऊन जातात शेगाव संस्थान मध्ये प्रवेश केल्यानंतर जणू काही आपण स्वर्गातच आलो की काय अशी अनुभूती प्राप्त होते शेगाव संस्थान ची शिस्त, स्वच्छता, नियोजन,आयोजन,भजन,कीर्तन, सेवाधारी भाविकांची नम्रता आणि संस्थांच्या विश्वस्तांचे आयोजन पाहून कुणीही भक्त शेगाव नगरीमध्ये जातो तर भारावून गेल्याशिवाय राहत नाही आज दुग्धशर्करा योग म्हणजे ज्यावेळी समर्थ सद्गुरु गजानन महाराज प्रगट झाले त्यावेळेस 23 फेब्रुवारी तारीख होती आणि त्यानंतर प्रथमच आज पुन्हा एकदा 23 फेब्रुवारी तारखेलाच गजानन महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे हा फार मोठा एक योगायोग म्हणावा लागेल गजानन महाराजांनी आपल्या अल्पशा कालावधीमध्ये भरपूर लीला केल्या 'लीला अनंत केल्या बंकट सदनास /पेटविले त्या अग्नि वाचुनी चीलमेस/ क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस/ केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश//असे प्रतीपादन अकोट तालुक्यातील वरुर जऊळका योग योगेश्वर संस्थान येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा मध्ये भागवताचार्य ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी केले व समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या सर्व श्रींच्या भक्तांना शुभेच्छा देन्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad