Type Here to Get Search Results !

राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच कार्य सदैव प्रेरणादाई - गजानन शिंदे.

राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच कार्य सदैव प्रेरणादाई - गजानन शिंदे.




 दि २२ फेब्रुवारी ला सायंकाळी ७ ते १० ह्या वेळात शिवजन्मोत्सवा निमित्त विडुळ येथे गजानन शिंदे मार्लेगांवकर यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
 
उमरखेड शिवछत्रपती मित्र मंडळ विडुळ ह्यांनी पहिल्यांदा देवसरी रोड लगतच्या कुस्ती मैदानावर कार्यक्रमाच भव्य आयोजन करण्यात आल होत.कार्यक्रमास गावातील प्रमुख राजकीय , सामाजीक नेतृत्व , माताभगिनी , नागरीकांसह पंचक्रोशीतील शिवप्रेमी ही गजानन शिंदे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित होते . छत्रपतींच्या चरित्रावर प्रकाश टाकताना गजानन शिंदे ह्यानी शिवजन्मापुर्वीचा इतिहास , जिजामाता व राजे शाहाजी ह्यांचे योगदान , बालवयात शिवरायांचे अद्भूत कार्य , संघटन कौशल्य , जिवाला जिव देणारे मावळे , मॅनेजमेंट , व्यापार उद्योजकता व शिवराय , पर्यावरण व शिवराय अशा विविध विषयाच त्यांच्या रसाळ वानीतुन मांडणी केली. 


त्यांच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.जागतिक किर्तीच्या व्यक्तीमत्वा बदद्ल भारतीय व विदेशी विचारवंतानी वेळोवेळी लिहुन ठेवलेली प्रेरक माहीती सांगितली.रविंद्रनाथ टागोर , सुभाषचंद्र बोस , बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील शिवराय ही त्यांनी मांडले . गावाचा विकास , पर्यावरण , संस्कृती ह्या साठी काम करणारा मावळा तयार व्हावा ही अपेक्षाही व्यक्त केली .
          

छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन , मनन , चिंतनाचा विषय आहे असेही ते म्हणाले . कार्यक्रमास सरपंच , सदस्य , विविध पदाधिकारी यांचे सह गजानन वाघमारे परजना व परमेश्वर शिंदे मार्लेगांव यांची उपस्थिती होती . संचालन कोत्तेवार , प्रास्ताविक आशुतोष बोन्सले व आभार शिवा गोरे ह्यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad