Type Here to Get Search Results !

उत्तर प्रदेशच्या रणांगणात..... प्रियांका गांधी च्या रूपाने इंदिरा गांधींची झाली आठवण.....! चक्क भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना भेटण्यासाठी केली गर्दी.

उत्तर प्रदेशच्या रणांगणात..... प्रियांका गांधी च्या रूपाने इंदिरा गांधींची झाली आठवण.....!



चक्क भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना भेटण्यासाठी केली गर्दी.



उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रियांका गांधींची क्रेज वाढली.



देशातील उत्तर प्रदेश हे राज्य राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे ज्या दिल्लीच्या तख्तावर देशाचे पंतप्रधान कोण ठरवणार हे अत्यंत महत्त्व शील जास्तीत जास्त खासदार असलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेश ची ओळख गेल्या अनेक वर्षापासून ची आहे. सध्या उत्तर प्रदेश मध्ये निवडणुकीची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे.


गेल्या अनेक दशकापासून या देशावर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. परंतु 2014 मध्ये नरेंद्र मोदीच्या लाटेमुळे काँग्रेस ची लाट ओसरली. पण काही वर्षातच अनेक राज्यातील निवडणुकांचे निकाल लक्षात घेता.... आणि विशेषता सध्या उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या प्रचंड निवडणुकीच्या रणधुमाळीत मध्ये स्वतः प्रियांका गांधी उतरल्याने चक्क भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी या पक्षाची पक्षा झेंड्याची परवा न करता एका मोठ्या अपेक्षेने व आतुरतेने त्यांना भेटण्यासाठी चढाओढ करत होती.


यानिमित्ताने पुन्हा एकदा या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची आठवण झाल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात होते. याचा अर्थ असा होतो, उत्तर प्रदेश मध्ये प्रियांका गांधी यांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली असून ही भारतीय जनता पार्टी साठी चिंताजनक बाब असून 2014 पासून ते 2022 पर्यंतभारतीय जनता पार्टीला या भेटी निमित्त पक्षाचे झेंडे घेऊन चक्क कार्यकर्ते काँग्रेसचा प्रियांका गांधींना भेटण्यासाठी आतुरतेने जातात. आणि विशेष म्हणजे प्रियांका गांधीजीही या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मन मोकळ्या पणाने भेटतात याची चर्चा सध्या सर्व देशभरात होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad