Type Here to Get Search Results !

निगंनुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेश वाटप

निगंनुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेश वाटप





प्रतिनिधी निगंनुर.मैनोदिन सौदागर

अति ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथे आज दि.२२/०२/२०२२ रोजी शाळेत मोफत गणवेश वाटप करण्यात आले शाळा समितीचे. अध्यक्ष देविदास खंदारे,उपाध्यक्ष रोहिदास राठोड. शिक्षण तज्ञ .तेजस राठोड.शरद पंडागळे ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश बरडे .उपसरपंच मेहमुनिसाबेग वलिउल्हाखाँन. सदस्य. अंकुश राठोड. बाळू जाधव यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

गावातील प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ८ पंर्यत मुले-मुली शिक्षण घेत आहे. असे एकूण २०३ .विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले येथील जि.प. शाळेत असलेले मुख्याध्यापक व्हि.के.चौधरी. व शिक्षकवृंद खुपच चिकाटीने व जिद्दीने काम करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहे. गावाच्या आजुबाजुला मराठी व माध्यमाच्या मोठमोठ्या शाळा आहेत त्यातच गावाची लोकसंख्या भरपूर असतांना सुध्दा शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक सु.म.काटोले.आर.फुलेवार. प्रताप मुंजाळ.सुभाष चिभडे.प्रदिप पवार.हे रात्रंदिवस मेहनत घेऊन काम करत आहे. अशातच त्यांना गावातील तरुणांची साथ मिळाल्यामुळे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, वेगवेगळे उपक्रम राबवुन शाळेचा दर्जा उंचवण्याचे काम गावातील ग्रामस्थ,तरुण व शिक्षक वृंद करीत आहे.


जिल्हा परिषदेकडुन दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले जातात. त्याप्रमाणे आज शाळेत गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक मुकतार आलि नवाब.अविनाश राठोड.विजय देवकते. सुनील बरडे.मंगल चव्हाण. नयुम आलि नवाब.प्रमोद जैस्वाल.बालाजी महाले. पि.सि.भोळे.मंगेश राठोड. सुनिल आडे.विनोद गव्हाळे.आसिफखाँन.आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad