Type Here to Get Search Results !

जि.प. व पं.स. निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी द्यावी - मा .डि.सी.राठोड

जि.प. व पं.स. निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी द्यावी - मा .डि.सी.राठोड 




प्रतिनिधी निगंनुर. मैनोदिन सौदागर.

निगंनुर सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ जवळपास संपुष्टात आलेला असून अवघ्या काही महिन्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक येऊन ठेपली आहे. उमरखेड तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट असून, बारा पंचायत समिती गण आहेत. उमरखेड तालुक्याचा व्याप हा फार मोठा असून निधीही फार मोठ्या प्रमाणात येत असतो. त्या अनुषंगाने राजकीय पक्षानी उमेदवार हा कर्तव्यदक्ष, होतकरू, प्रामाणिक असेल का? या गोष्टीचा विचार करून उमेदवारी प्रदान करावी व नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असे मत डि .सी.राठोड रा घमापूर माजी विभागीय अधिकारी .यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक. पुसद मी २८ वर्षे ची सेवा केली असुन ११ वर्षे पुसद उमरखेड .महागाव. येथे विभागीय अधिकारी म्हणून बँकची व जनतेची सेवा केली तसेच बंदी भाग म्हणून ओळखले जाणारे .चिखली वन येथे नवीन शाखा उघडली या शाखेला २१ गावे जोडली यांनी व्यक्त केली आहे.
उमेदवारी देऊ नये. एखादा उमेदवार गरीब का असेना मात्र तो गोरगरीब समाजाचे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता निःस्वार्थपणे काम करत असेल तर पक्षानी त्यांचा विचार करावा. जे जुने पदाधिकारी पद भोगून भोगून जर विकास काम भकास करत असेल तर त्यांना पक्षानी उमेदवारी देऊ नये. एखाद्या चांगल्या नवीन होतकरू व्यक्तीला व खास करून ग्रामीण भागात उच्चशिक्षित व्यक्तीला नेतृत्व करण्याची आवड असलेल्यांना राजकीय व सामाजिक प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. गावाविषयी, परिसराविषयी गावविकास करण्याची जाणीव असली पाहिजे, असे मत सेवानिवृत्त डि.सी.राठोड यांनी बोलले आहेत वंशपरंपरागत चालत आलो म्हणून यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad