Type Here to Get Search Results !

पटवर्धन कुरोली मधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोन आरोपींना करकंब पोलिसांनी केली अटक

पटवर्धन कुरोली मधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोन आरोपींना करकंब पोलिसांनी केली अटक
करकंब(प्रतिनिधी) :-

   पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणसाठी फुस लावुन पळवून नेल्याचा गुन्हा करकंब पोलिसात दि २३ जानेवारी २०२२ रोजी दाखल करण्यात आला होता.सदरच्या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे हे करीत होते.
     सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेची हददीमधुन फरारी आरोपींचा शोध मोहीम घेणेबाबत आदेश देण्यात आलेले होते.
करकंब पोलीस ठाणेकडील गु.र.नं. २१/ २०२२ भादविसं ३६३ मध्ये पटवर्धन कुरोली मधील एका अल्पवयीन बालिकेला अज्ञात कारणसाठी फुस लावुन पळवून नेल्याचा गुन्हा दिनांक २३/०१/२०२२ रोजी दाखल करण्यात आलेला होता. सदरच्या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी तपासाची चक्रे फिरवत माहीती घेतली असता दोन इसमांनी पल्सर मोटार सायकलीवरून मध्यरात्री अल्वयीन मुलीस पळवुन नेतानाचा नेत्र साक्षीदार मिळाल्याने संशयीत आरोपी यांचा माग काढण्यास सुरवात केली असता पिराची कुरोली ता. पंढरपुर असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली असता आरोपी चाकण एम आय डी सी येथे वावर असल्याची माहीती मिळताच तात्काळ सपोनि निलेश तारु यांनी पथक तयार करून शोध मोहीम राबविली असता पोउपनि अजित मोरे यांचे पथकाने दिनांक २७/०१/२०२२ रोजी पुणे येथे जावुन दिवसरात्र २४ तास सलग शोध घेत दोन आरोपी व पिडीत मुलीस ताब्यात दि २८/०१/२०२२ रोजी घेवुन करकंब पोलीस ठाणेस आले. सदरच्या आरोपींनी पो. ठाणे हददीमधील शाळकरी अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेलेले होते सदरच्या मुलीची वैदयकीय तपासणी केली असता तिचेवर आत्याचार झालेले असल्याने गुन्हयामध्ये आत्याचारा संबंधी कलमवाढ करून तिला सध्या शासनाचे नविन धोरणानुसार बालसुधारगृह सोलापुर येथे प्रबोधनकरीता दाखल करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी मनोज उर्फ ऋषिकेश तानाजी सुतार रा. पिराची कुरोली याचे यापुर्वी दोन लग्न झाल्याचे समजते तसेच त्याला मदत करणारा मित्र आरोपी दिनेश दत्तात्रय कौलगे रा. पिराची कुरोली यालाही अटक करण्यात आलेली आहे. तसेच सदरच्या दोन आरोपी यांच्या मुसक्या आवळुन महीला व बाललैगींक आत्याचार कलमे रिमांड करीता हजर केले असता त्यांना ०५ दिवस पोलीस कोठडी मिळालेली असुन तपास पोउपनि/ अजित मोरे यांनी केलेला असुन सदरच्या आरोपीस आणखीन कोणी मदत केलेली आहे काय याबाबत तपास सुरु आहे.
सदरच्या कामगीरी सपोनि / श्री निलेश तारु यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु असुन पोउपनि/ अजित मोरे, पोहवा / १५८३ मोरे, पोना/ ९०३ कांबळे, मपोना/पवार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News