Type Here to Get Search Results !

सफाई कर्मचाऱ्यांची रुग्णालय प्रशासनाकडून अवहेलना

*सफाई कर्मचाऱ्यांची रुग्णालय प्रशासनाकडून अवहेलना*

कुटीर रुग्णालयातील सफाई कर्मचारी दोन वर्षापासून मानधनापासून वंचित
'प्रहारचे' जिल्हा शल्य चिकीत्सकांना निवेदन
उमरखेड
 दि.2_फेब्रु       

 येथील उत्तरवार शासकिय रुग्णालयामध्ये कंत्राटी सफाई कामगार व ड्रेसर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन डिसे 202O पासून  जाने 2022 पर्यंत चे वेतन देण्यात आले नसल्याने रुग्णालय प्रशासनाकडून सफाई कामगारांची आर्थिक कुचंबना होत असल्यामुळे वेतनापासून वंचित असणाऱ्या सफाई कामगारांना त्वरीत वेतन अदा करावे अशी मागणी 'प्रहार' जनशक्ती पक्षाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे .
        कोवीड -19 च्या थरकाप उडविणाऱ्या काळात आपला जिव धोक्यात घालून "कोविड योद्धा" म्हणून रुग्ण सेवेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या सफाई कामगारांसह ड्रेसरचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सन डिसे.2020 पासून अद्यापही त्यांचे दरमहा वेतन मिळाले नाही.त्यांच्या हक्काच्या मानधनापासून रुग्णालय प्रशासनाने त्यांना वंचित ठेवत त्यांची थट्टा मांडली आहे.हे तुटपुंजे मानधन पण त्यांना वेळेवर मिळत नसल्याने  वेतनापासून वंचित असणाऱ्या सफाई कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे .
       याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ द्यावे अन्यथा 'प्रहार' जनशक्ती पक्षातर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा 'प्रहारचे' शहरप्रमुख राहुल मोहितवार यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला आहे .
यावेळी अंकुश पानपट्टे, गजानन धोंगडे, ओम प्रकाश पुरी, विवेक जळके, चंद्रकांत गायकवाड, ओम सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांसह सफाई कामगार सुद्धा उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad