करकंब प्रतिनिधी :- अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने
नेमतवाडी ता पंढरपूर येथील विक्रम महादेव भालेराव वय 37 वर्षे या युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी रात्री सवा एक वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी सोलापूर महामार्गावर
रावसाहेब देशमुख यांच्या पेट्रोल पंपा समोर घडली
याबाबत सविस्तर माहिती अशी की नेमतवाडी येथील विक्रम भालेराव हे खाजगी कंपनीत कामाला होते 30 जानेवारी रोजी खाजगी कंपनीच्या कामानिमित्त पुणे येथे मोटारसायकल वरून गेले होते 1 जानेवारी रोजी कंपनीचे काम संपवून ते नेमतवाडी कडे निघाले 2 जानेवारी रोजी पुणे सोलापूर महामार्गावरून टेंभुर्णी हद्दीतील रावसाहेब देशमुख यांच्या पेट्रोल पंपा समोर आले असता विक्रम यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल क्रमांक एमएच 13 डी एफ 0662 या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला याबाबतची फिर्याद महादेव श्रीपती भालेराव यांनी टेम्भुर्णी पोलिसात दिली त्यांच्या पश्चात,पत्नी,एक मुलगा,वडील,आई,एक भाऊ आणि भावजय असा परिवार आहे त्यांच्यावर नेमतवाडी येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले .