Type Here to Get Search Results !

सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली.

सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली.


 पिंपरी – मराठी व हिन्दी रंगभूमीचे सिने कलाकार श्रेयस तळपदे यांनी नुकतीच पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्चला भेट दिली.

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलचे विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांना आमंत्रित केले होते. यावेळी श्रेयस यांचे समारंभपूर्वक स्वागत केले तसेच रुग्णालयातील सुविधांना भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधला. 


हॉस्पिटल बद्दल बोलताना सिने अभिनेते श्रेयस तळपदे म्हणाले “2011 खाटांच्या या रुग्णालयामध्ये पायाभूत व जागतिक दर्जाच्या सेवा आणि सुविधापाहून मी भारावून गेलो आहे आणि आज मला खूप आनंद होत आहे हे रुग्णालय अनेक रुग्णांना सर्वोत्तम रुग्णसेवा देण्यास सक्षम आहे”. 

या दरम्यान त्यांनी बालरोग वॉर्डला भेट दिली आणि तेथे दाखल असलेल्या मुलांशी संवाद साधला यावेळी रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आधुनिक लायब्ररी, पर्यावरणपूरक ऑपरेशन थिएटर, आय व्ही एफ सेंटर, 3 टेस्ला विडा मशीन, दा विंची 4 जनरेशन रोबोटिक सर्जरी युनिट आणि 24X7 यशोदा माता दुग्ध पेढी तसेच अत्याधुनिक 140 खाटांच्या ICU सुविधाना भेटी दिल्या हे सर्व पाहून त्यांनी हॉस्पिटलचे कौतुक केले.

"मराठी चित्रपट, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अश्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव कमावले आहे. भूमिका कोणतीही असो आपल्या उत्तम अभिनयाने श्रेयस तळपदे नेहमीच स्वतःची अशी वेगळी छाप सोडत असतात" असे मत डॉ. यशराज पाटील यांनी व्यक्त केले. 

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी पाटील व प्र - कुलपती डॉ भाग्यश्रीताई पाटील या दोघांनीही सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या मराठी व हिंदी रंगभूमीवरील दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies