Type Here to Get Search Results !

प्रदूषण मुक्तीसाठी धावले ३९५ युवक ओबीसी जनगणनेचीही जनजागृती गडचांदुरात पार पडली मॅरेथान स्पर्धा

प्रदूषण मुक्तीसाठी धावले ३९५ युवक
ओबीसी जनगणनेचीही जनजागृती
गडचांदुरात पार पडली मॅरेथान स्पर्धा 



चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना - टीम विदर्भ स्पोर्टींग क्लब गडचांदूर यांच्या वतीने गडचांदूर येथे विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे नुकतेच आयोजन पार पडले. यामध्ये विदर्भातील एकूण ३९५ युवकांनी सहभाग घेतला.


        पुरुष गटात प्रथम क्रमांक शिवाजी गोस्वामी, द्वितीय क्रमांक प्रवीण लांडे व तृतीय क्रमांक नागेश्वर रस्से यांनी पटकाविला. तर महिला गटात प्रथम क्रमांक परभणी येथील वर्षा कदम, द्वितीय क्रमांक लावण्या नागरकर तर तृतीय क्रमांक तेजस्विनी कांबळे हिने पटकाविला.
         


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी उपस्थित होते तर उद्घाटन नगराध्यक्ष सविता टेकाम यांच्या हस्ते पार पडले यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, नगरसेविका मिनाक्षी एकरे, नगरसेविका सुनिता कोडापे, डॉ. घाटे, मनोज भोजेकर, रवी शेंडे, प्रा. आशिष देरकर, प्रवीण काकडे, डॉ. कुलभूषण मोरे, सुनिल अरकीलवार आदी मान्यवर उपस्थित होते. 
       

मॅरेथॉनमध्ये युवकांनी प्रदूषण हटाव, गडचांदूर बचाव व ओबीसींची जनगणना झाली पाहिजे याबाबत पोस्टर लावून जनजागृती केली. मॅरेथॉन स्पर्धेसाठी आरोग्य विभाग व पोलिस विभागाने सहकार्य केले. संचालन ईश्वर सोयाम यांनी केले. यशस्वितेकरिता पंकज सोनुले, अंकित मारगोणवर, वैभव चिकनकर, मयूर गर्गेलवार, विकास सोनारखन, हेमंत भोयर, प्रज्वल नवलकर, केतन काळे, प्रलय पेंदोर, सुरेश ठाकरे, सुरेश निर्मल, गौरव झाडे, दिगंबर कुमरे, तेजस ढूमने व मंडळाच्या इतर सदस्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad