एस.पी.स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न
करकंब प्रतिनिधी: नांदोरे ता.पंढरपूर येथील पायल फाऊंडेशन संचलित एस.पी. स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे ,प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सुरज अलगडे, मराठी विभागप्रमुख साईनाथ कुंभार यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केलेली होती.
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गवळण, भारुड ,लोककला, पोवाडा ,पाळणा ,अभंग, कविता वाचन,कथा, एकपात्री नाटक, देशभक्तीपर गीते यांसारख्या विविध कला सादर केल्या .
एस.पी. स्कूल ही इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा / असूनसुद्धा येथे पहिल्यापासूनच मराठी भाषेला विशेष प्राधान्य दिले जाते जि. प. शाळांमध्ये जो मराठी विषय शिकवला जातो तोच विषय या ठिकाणी शिकवला जात आहे. तसेच मंथन ,स्कॉलरशिप, नवोदय यासारख्या परीक्षासुद्धा येथे मराठी माध्यमातून घेतल्या जातात व त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. शाळेच्या या उपक्रमाबद्दल सर्व परिसरामध्ये विशेष कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल मोरे व पूनम भगत या केले .तबलावादन रामेश्वर भारती याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले