Type Here to Get Search Results !

पुण्यातील संमेलनात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड टीमचा राज्यातून द्वितीय क्रमांकाने गौरव

पुण्यातील संमेलनात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड टीमचा राज्यातून द्वितीय क्रमांकाने गौरव



उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव  



उमरखेड येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्यातर्फे भोसरी जिल्हा पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित पर्यावरण संमेलन २०२२ मध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेड टीमला पाटील सर आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या हस्ते राज्यातून द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर सौ. माई ढोरे,मुख्य वनसंरक्षक श्री रंगनाथ नाईकडे साहेब ज्येष्ठ सिनेअभिनेते तसेच संस्थेचे ब्रँड अँबेसिडर जयराज नायर ,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुयोग धस ईत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने गेल्या तीन वर्षात राबवलेल्या विविध पर्यावरण पूरक व मानवता विकासाच्या दृष्टिकोनातून उपक्रमामुळे उमरखेड टिमचा हा गौरव करण्यात आलेला आहे.

तसेच टीमला संयुक्तपणे स्टार परफॉर्मन्स आवार्ड, व सर्व सदस्यांना "निसर्ग मित्र " पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले.

          या स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यातील टिमने सहभाग घेतला होता. त्यामधून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड टीमची निवड करण्यात आली. यामुळे औदूंबर नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. उमरखेड टिमने निर्माण केलेल्या "वनराई बंधारे" या नाविन्यपूर्ण उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली. पुरस्कार स्वीकारण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे दीपक ठाकरे ,प्रभाकर दिघेवार ,गजानन रासकर ,राजेश माने, रामकिसन शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad