Type Here to Get Search Results !

सहस्त्रकुंड येथील एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये खुणि स्टाईल हाणामारी व जाळपोळ

सहस्त्रकुंड येथील एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये खुणि स्टाईल हाणामारी व जाळपोळ




हिमायतनगर प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे

किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड येथील एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शुल्लक भांडणाचे रुपांतर हाणामारीत व जाळपोळीत झाल्याचे दिसून येत आहे. येथील एकलव्य रेसिडेंशियल शाळेमधील अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे पैसे चोरी गेले शुल्लक कारणावरून त्यांनी दहाव्या वर्गापासून सहाव्या वर्गापर्यंत च्या मुलांना मारले व चोरी केली का अशी विचारणा केली.





संबंधित विद्यार्थ्यांनी झाला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांना कळताच पालक शाळेत जाब विचारण्यासाठी शाळेत आले असता अकरावी व बारावीचे विद्यार्थ्यांनी त्यांना सुद्धा मारहाण केली व शालेय पटांगणातील तीन मोटरसायकली जाळून टाकल्या व दोन मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा केला.



सदर घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले याची प्राथमिक माहिती मिळत आहे .निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी किरण किरण पुजारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. शाळेचे प्रिन्सिपल यांच्या हाताला जबर मार लागला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad