Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणास किनवट येथून पाठिंबा.

छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणास किनवट येथून पाठिंबा.




किनवट प्रतिनिधी :- निरंजन मिरासे

 रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज असून सुद्धा रयतेसाठी उपाशी अमरण उपोषण आझाद मैदान मुंबई येथे करीत असून त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आदिवासीबहुल भागात असलेल्या किनवट तालुक्यातील छावा संघटना संभाजी बिग्रेड यांनी एका निवेदनाद्वारे पाठिंबा दर्शविला असून वेळप्रसंगी राजाच्या मार्गदर्शनानुसार रुद्र जंय आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे लवकरच मार्ग काढण्यात यावा अन्यथा होणाऱ्या परिणामास राज्य शासन जबाबदार राहील असे मत संभाजी ब्रिगेडचे अजय पाटील कदम घोटीकर यांनी बोलताना व्यक्त केले

यावेळी छावा संघटनेचे अध्यक्ष अरविद पाटील कदम , संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अजय पाटील कदम, स्वराज्य मित्र मंडळ नांदेड जिल्हा संस्थापक अध्यक्ष निरंजन भाऊ मिराशे पाटील,किरण ठाकरे पाटील पत्रकार,माधव चव्हाण पाटील,ओम काकडे पाटील,प्रमेश्वर पाटील,शिध्देश्वर आडकिने पाटील,श्री पवार ,किशन पाटील मुंगल व सर्व किनवट परिसरातील सर्व मराठा बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad