करकंब प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूर विभागातील कार्यकर्त्यांसाठी रविवार दि. १३ रोजी मरवडे येथे एक दिवसाचे कार्यकर्ता चेतना शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.सुरेखा इंगळे मॕडम यांनी दिली .
न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात शिक्षक समिती कार्यरत असून समितीचे संस्थापक राज्य सरचिटणीस स्व.वि.भा.येवले यांनी सोलापूर जिल्ह्यातील गावागावात शिक्षक समितीप्रेमी कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केली होती . तिच परंपरा जिल्हाध्यक्ष अनिल कादे, जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी पंढरपूर तालुक्यात तालुकाध्यक्ष सुनिल कोरे सर जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे जिल्हा उपाध्यक्ष डाॕ सचिन लादे सरचिटणीस पोपट कापसे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आण्णासाहेब रायजादे हे सहकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे चालवत आहेत .
संघटनेचे कार्य व ध्येय्य धोरण तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम तालुका शाखांतील केंद्र संघटकच्या माध्यमातून होत असते .
संघटनेचा कणा असलेल्या कार्यकर्त्यांची बांधणी व सकारात्मक ऊर्जा देण्याचे अभियान शिक्षक समितीने हाती घेतल्याचे महिला आघाडीच्या जिल्हा कार्यालयिन चिटणीस सौ चंद्रकला खंदारे मॕडम यांनी सांगितले . त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या चार तालुका शाखांतील तालुका कार्यकारिणी पदाधिकारी , महिला आघाडी पदाधिकारी व तालुका शिक्षक पतसंस्थांचे संचालक अशा प्रमुख २०० कार्यकर्त्यांचे पहिल्या टप्प्यात प्रेरणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
शिक्षक समितीचे राज्यनेते सुरेश पवार यांच्या निवासस्थानी रविवार दि. १३ रोजी स.११ ते ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे . यामध्ये तालुका शाखांचा कार्य आढावा, संघटना बांधणी, राज्य व जिल्हा शिक्षक समितीचे कार्य , संघटनात्मक कार्याचा प्रचार - प्रसार ,आगामी काळासाठी ध्येय्य धोरणे या विषयावर दोन सत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे . याशिवाय कार्यकर्त्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना , प्रश्न व उपक्रमांचे संकलन देखील करण्यात येणार आहे .
त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात मोहोळ येथील मनोहरभाऊ डोंगरे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात येणार असून मंगळवेढ्यातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्र तसेच शिष्यवृत्ती धारक शिक्षक पाल्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे अशी माहिती महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ देवकी कलढोणे मॕडम यांनी दिली ,हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ अर्चना कोळी कार्याध्यक्षा सौ अनिता माने.कोषाध्यक्षा सौ सुवर्णा टकले उपाध्यक्षा सौ मंजिरी देशपांडे.सौ सुप्रिया आम्ले.प्रसिद्धी प्रमुख सौ अनिता वेळापूरकर मॕडम यांच्यासह स्थानिक शाखेतील प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत .